Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये आयुष्यभर मोफत खाऊ शकता, तर तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. मात्र, असे होणे जवळजवळ अशक्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडे अशी सुविधा आहे.
अलीकडे, वॉरेन बफेट यांच्या मुलाखतीदरम्यान, बिल गेट्स यांच्याकडे मॅकडोनाल्ड्स गोल्ड कार्ड आहे, ज्याच्या मदतीने ते या फूड चेनच्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये विनामूल्य जेवू शकतात.
बिल गेट्स यांच्यासाठी कायमचे फ्री
- बफेट म्हणाले की त्यांच्याकडे एक विशेष कार्ड आहे जे त्यांना कोणत्याही ओमाहा मॅकडोनाल्डमध्ये मोफत जेवण देते. मात्र बिल गेट्स यांच्याकडे असलेल्या कार्डमुळे त्यांना जगात कुठेही मोफत मॅकडोनाल्डचा आनंद घेता येतो.
- हे कार्ड मिळणे अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. बफे यांनी विनोदीपणे सांगितले की केले की माजी अध्यक्ष क्लिंटन यांनाही याची अपेक्षा होती, परंतु त्यांना ते कधीच मिळाले नाही.
बफेट यांची होटल चेन देखील ऑफर करते मोफत जेवण
बफेट यांनी त्यांच्या जॉनी रॉकेट्स नावाच्या डिनर चेनसाठी एक विशेष कार्ड देखील लाँच केले आहे. तीन विशेष व्यक्तींना हे सुविधा देण्यात आली आहे, जे दर्शविते की या कंपन्या ग्राहकांसाठी पर्सनल फायद्यांच्या पुढे विचार करतात आणि इतरांशी एक्सपिरियन्स शेअर करण्यास प्रोत्साहन देतात. प्रचंड मालमत्तेचे धनी असूनही गेट्स आणि बफेट दोघेही नेहमी डाउन-टू-अर्थ राहतात. फाउंडेशनद्वारे ग्लोबल हेल्थ प्रोग्राम्सवर गेट्सचे प्रामुख्याने लक्ष असते.