Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ना बिनशर्त पाठिंबा, ना प्रचारसभा; स्वत:ला भोपळा, पण ‘या’ पक्षानं वाचवल्या भाजपच्या १४ जागा

12

लखनऊ: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानं सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या. तर गेल्या वेळी ६२ जागा जिंकणारा भाजप यंदा थेट ३१ वर आला. त्यांच्या निम्म्या जागा कमी झाल्या आणि लोकसभेत जादुई आकडा स्वबळावर गाठण्याचं स्वप्न भंगलं. बहुजन समाज पक्षाला २०१४ प्रमाणेच यंदादेखील भोपळा मिळाला. त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. स्वबळावर लढलेल्या बसपनं कोणाचं नुकसान केलं? कोणाला तारलं? याची आकडेवारी आता समोर आली आहे.

महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत त्यांच्यासाठी सभा घेतल्या. त्यांच्या बिनशर्त खेळीची बरीच चर्चा झाली. पण भाजपसाठी बसप गेमचेंजर ठरला. त्यांच्यामुळे मोठी नामुष्की टळल्याचं आकडेवारी सांगते. बसपला ९.३९ टक्के मतदान झालं. बसपनं इंडिया आघाडीत यावं यासाठी काँग्रेसचे नेते अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. इंडिया आघाडीत गेल्यास पक्षाचं नुकसान होईल अशी अध्यक्षा मायावतींची भूमिका होती. त्यामुळे बसपनं एकला चलो रे ची भूमिका घेतली. त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला.
महत्त्वाकांक्षी योजनेला विरोध, UCCवर ठाम भूमिका; JDUचं दबावतंत्र; काय करणार भाजप?
उत्तर प्रदेशातील १६ जागांवर बसपमुळे इंडिया आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. यातील १४ जागांवर भाजप विजयी झाला. तर भाजपचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रीय लोक दल आणि अपना दल (सोनेलाल) प्रत्येकी एका जागेवर बसपच्या स्वबळाचे लाभार्थी ठरले. अकबरपूर, अलीगढ, अमरोहा, बांसगाव, भदोही, बिजनोर, देवरिया, फर्रुखाबाद, फतेपूर सिकरी, हरदोई, मेरठ, मिर्झापूर, मिश्रिख, फुलपूर, शाहजहापूर आणि उन्नावमध्ये बसपानं घेतलेली मतं विजयी उमेदवारांच्या मतांहून अधिक आहेत.

बसपमुळे इंडिया आघाडीला लोकसभेत मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यांच्या १६ जागा बसपमुळे गेल्या. अन्यथा चित्र खूप वेगळं दिसलं असतं. लोकसभत एनडीए २७८ जागांवर असता, भाजप २२६ पर्यंत खाली आली असता. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा थेट १७ पर्यंत घसरल्या असत्या. त्यामुळे सरकार स्थापन करणं त्यांना आणखी अवघड गेलं असतं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.