Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०८:-“शासन निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अनेक कामे करत आहे. पण निसर्गक्षेत्राचा आवाका बघता हे केवळ शासनाचे काम नाही. त्याला सर्वांचाच हातभार लागणे आवश्यक आहे. अशा संस्था किंवा अशा व्यक्ती प्रसिद्धीची, कौतुकाची अपेक्षा न ठेवता निसर्गकामे करत आहे ही खरं तर अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींना, संस्थांना आवश्यक सहकार्य शासनामार्फत दिले जाईल यासाठी आपण प्रयत्न करू.” असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी येत्या दहा जून ला त्यांचा पासष्ठावा वाढदिवस साजरा करताना 65 हजार देशी झाडं लावून त्यांचे संगोपन करण्याचा आणि कोथरूड गावठाण ते कोथरूड उपनगरात ( बावधन, बाणेर, बालेवाडी परिसरात ) निसर्ग समृद्ध कोथरूड असावे असा संकल्प केला आहे. त्यास अनुसरून आज नेचरवॉक, क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वन विभागाने वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दहा संस्था व व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ना. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
यावेळी मुख्य वन संरक्षक एन.आर. प्रवीण, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. कल्याणी खर्डेकर आणि नेचरवॉक चॅरिटेबल ट्रस्ट चे अनुज खरे, उप वनसंरक्षक महादेव मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते.
एन. आर. प्रवीण म्हणाले ” वन विभाग ह्या संकल्प पूर्ती साठी सर्वतोपरी सहकार्य करेल व कोथरूड भागातील टेकडया, वन विभागाच्या जागा, मोकळी मैदाने व इतर सर्व ठिकाणी देशी झाडांचे वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनासाठी योजना आखेल.
अनुज खरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की पुण्यात निसर्गातील प्रत्येक घटकावर काम करणारी अनेक तज्ञ लोकं आहेत. यातील अनेक लोकांची कामं सर्वसामान्य लोकांसमोर येत नाहीत. या पुरस्कारांमागे नेमकी हीच संकल्पना आहे. निसर्ग क्षेत्रात काम करणाऱ्या काही निवडक लोकांचे सन्मान करून त्यांना असे काम अधिक जोमाने सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे हे यातून घडू शकेल.
सौ. कल्याणी खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की “क्रिएटिव्ह फाउंडेशन व नेचरवॉक ह्या स्वयंसेवी संस्था पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक कार्यात भरीव व दीर्घाकालीन काम करत असून, मा. चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरूड वृक्ष संपदा अभियानात ह्या दोन ही संस्था सक्रिय सहभाग नोंदवतील. ह्या अभिनव पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या वाढदिवसाबद्दल त्यांनी चंद्रकांतदादांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व वन विभागाच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत असल्याचे आवर्जून नमूद केले.
अनुज खरे आणि प्रतीक खर्डेकर यांनी चंद्रकांतदादांचा सत्कार केला.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
१. तुहिन सातारकर – रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या वन्यजीव सुटका आणि नैसर्गिक अधिवासात मुक्तता या विषयात काम करणाऱ्या संस्थेचे काम पाहणाऱ्या तुहिन सातारकर यांनी या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे.
२. नचिकेत उत्पात – रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या वन्यजीव सुटका आणि नैसर्गिक अधिवासात मुक्तता या विषयात काम करणाऱ्या संस्थेत काम करणाऱ्या नचिकेत उत्पात यांनी निसर्ग साक्षरता प्रचार आणि प्रसार उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
३. डॉ. निकिता मेहता – रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या वन्यजीव सुटका आणि नैसर्गिक अधिवासात मुक्तता या विषयात काम करणाऱ्या संस्थेत काम करणाऱ्या डॉ. निकिता मेहता यांनी वन्यजीव वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे.
४. डॉ. सचिन पुणेकर – अतिशय सुप्रसिद्ध निसर्गतज्ञ आणि वनस्पतीशास्त्र तज्ञ. या विषयातील अनेक शोध त्यांच्या नावावर आहेत. वनविभागासोबतही त्यांनी या क्षेत्रात मोठे काम केले आहे.
५. अमिता देशपांडे – टाकावू प्लास्टिकचा पुनर्वापर करून अनेक वस्तू बनवणाऱ्या री-चरखा या संस्थेच्या प्रमुख. प्लास्टिक सारख्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या उपाय. अनेक स्थानिक लोकांना याद्वारे रोजगार निर्मिती.
६. Devi Constructions Private Ltd. – एप्रिल व मे महिन्यात उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईवर उपाय म्हणून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देऊन वनविभागातर्फे वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय.
७. ICICI Foundation – वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अनेक वनक्षेत्रात वनविभागामार्फत गस्त घातली जाते. ते अत्यंत गरजेचेही असते. त्यांचे हे काम सुखकर आणि वेगवान होण्यासाठी गस्त वाहने पुरवण्याची मदत वनविभागाला केली.
८. TATA BlueScope Steel Pvt. Ltd. – सिंहगड परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे काम
९. Corbett Foundation – वनविभागाच्या पश्चिम क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांसाठी भरीव योगदान
१०. डॉ. प्राची मेहता – मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्ष काम. जंगलांवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी बांधवांना उपजीविकेचे पर्याय निअर्मान करून त्यांचे जंगलावर असलेले अवलंबित्व कमी करण्यावर भर.