Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फोन इडंस्ट्रीचा अंडरटेकर पुन्हा जिवंत होणार? थेट अ‍ॅप्पल-सॅमसंगशी भिडणार का?

10

तैवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी HTC पुढील आठड्यात U सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करू शकते. हा HTC U24 किंवा U24 Pro नावाने सादर होऊ शकतो. हे स्मार्टफोन्स गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या HTC U23 आणि HTC U23 Proची घेतील. HTC U24 Pro मध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 7 Gen 3 दिला जाऊ शकतो.

HTC नं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून 12 जूनला तैवानमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याची माहिती दिली आहे. या पोस्टर मध्ये स्मार्टफोनची एक बाजू दाखवण्यातआला आहे आणि त्याचबरोबर ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. ही पोस्ट टेक कम्युनिटीमध्ये वायरल झाली आहे. मोठ्या टेक युटूबर्सनी कंपनीचे स्वागत केले आहे. तसेच अनेकांनी आपल्या जुन्या आठवणी शेयर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एचटीसीचा आगामी फोन भारतीय बाजारात येणार असल्याची देखील बातमी आली होती. त्यामुळे कंपनी जोरदार कमबॅक करणार का? हे पाहावं लागेल.भारतातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन झाला लाँच; सॅमसंगला देखील मागे टाकले, इतकी आहे किंमत

कंपनीनं शेयर केल्या पोस्टमधून कोणता स्मार्टफोन येईल याची माहिती दिली नाही. हा HTC U24 किंवा U24 Pro प्रो असू शकतो. अलीकडेच बेंचमार्किंग साइट Geekbench आणि Bluetooth SIG वर HTC U24 Pro मॉडेल नंबर 2QDA100 सह दिसला होता. या लिस्टिंगवरून यात प्रोसेसर म्हणून क्वॉलकॉमचा Snapdragon 7 Gen 3 असल्याची माहिती मिळाली आहे. सोबत 12GB RAM देखील दाखवण्यात आला होता.

HTC U24 आणि U24 Pro मध्ये HTC U23 आणि U23 Pro च्या तुलनेत अपग्रेड केले जाऊ शकतात. या स्मार्टफोन्समध्ये फुल HD+ OLED डिस्प्ले कायम ठेवला जाऊ शकतो. HTC U23 आणि HTC U23 Pro मध्ये फुल HD+ (1,080 x 2,400 पिक्सल) OLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून Snapdragon 7 Gen 1 चा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोन्समध्ये 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज आहे.

HTC U23 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह आहे. HTC U23 Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्सच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4,600mAh ची बॅटरी 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मिड-रेंज सेगमेंटमध्ये HTC ची विक्री वाढली आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोन्स देखील याच सेगमेंटमध्ये येऊ शकतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.