Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
जबरी चोरी करणा-या आरोपींना दोन तासाचे आत अटक करून गुन्हा केला उघड,गुन्हे शाखा युनीट २ ची कामगिरी…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(८) रोजी यातील तक्रारदार आशीष रामदास माहूलकर रा. श्रीविहार कॉलनी, साई नगर अमरावती अमरावती यांनी पो.स्टे. राजापेठ येथे तक्रार दिली की, दि(८) रोजी ते घरी असतांना दुपारी ४.३० ते ०४.४५ वा दरम्यान त्यांचे वडील घरासमोर येत असतांना एक अनोळखी इसम अंदाजे वय २४ ते २६ वयोगटातील काळया रंगाच्या मोटारसायकलवर आला व त्याने त्याची मोटर सायकल काही अंतरावर उभी करून फिर्यादीचे वडील यांच्या जवळ येऊन व त्याने फिर्यादीच्या वडीलांचे गळयातील सोन्याची ३० ग्रॅमची चैन किं.१,५३,०००/- रु ची जबरीने तोडून मोटारसायकल ने पळून गेला. अशा फिर्यादीच्या तकारीवरुन वरून पो.स्टे. राजापेठ येथे अप.क्र. ३३३ / २०२४ कलम ३९२ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आदेशीत केल्यावरून पोलिस निरीक्षक राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट २ यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दि(०८) रोजी गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना टांगा पडाव अमरावती येथे गुन्हे शाखा युनिट २ चे
पथकाने सापळा रचुन सदर गुन्हयातील आरोपी यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख जाहेद उर्फ हाफीज शेख हारून वय २१ वर्ष रा. अपनी बेकरी च्या मागे, अलकरीम नगर नं. १ अमरावती अशे सांगितले. त्यास सदर जबरी चोरीच्या गुन्हयाबाबत विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास विश्वासात
घेवुन शिताफीने बारकाईने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याचे ताब्यातून गुन्हयात जबरीने चोरी केलेली ३० ग्रॅम ची सोन्याची चैन व गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी वाहन एकूण १,६८,००० /- रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला
सदरचा जबरी चोरीचा गुन्हा केल्याने पोलीसां समोर गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान असतांना गुप्त माहितीवरून
गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने दोन तासातच सदरचा गुन्हा उघडकिस आणून उल्लेखनिय कामगीरी केली.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे साहेब,पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त. शिवाजी बचाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, सफौ राजेंद्र काळे, पोहवा जावेद अहमद, गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, नापोका संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चंद्रशेखर रामटेके, पोकॉ चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, चापोहवा संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.