Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साप्ताहिक अंकशास्त्र, 10 ते 16 जून 2024: मूलांक ५ असणाऱ्यांसाठी ‘खास’ बातमी ! मूलांक ३ असलेल्यांचा होऊ शकतो विश्वासघात ! जाणून घ्या, तुमचे अंकभविष्य

14

Weekly Numerology 10 June To 16 June 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 10 जून ते 16 जून दरम्यान अनेक शुभ योग जुळून येत आहेत. ज्यामुळे मूलांक 1, मूलांक 2 आणि मूलांक 4 असलेल्या लोकांना लाभ होईल. या आठवड्यात 18 जून रोजी निर्जला एकादशी आहे. जून महिन्यात मूलांक 1, मूलांक 4 आणि मूलांक 8 असलेल्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. तर मूलांक 2 असलेल्या लोकांना प्रेमविवाहाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. पाचव्या क्रमांकाच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास असेल कारण या आठवड्यात पाचव्या क्रमांकाच्या लोकांना सुख-दु:खाशी संबंधित बातम्या मिळतील. चला, मूलांक 1 ते मूलांक 9 साठी १० जून ते १६ जूनपर्यंत कसा असेल आठवडाते सविस्तर जाणून घेऊया.

मूलांक १ : सुंदर भविष्याचे नियोजन कराल

कार्यक्षेत्रात प्रगती होईल, तसेच तुमच्या कार्यक्षैलीत बरेच बदल होताना या आठवड्यात दिसेल. या आठवड्यात प्रोजेक्टमध्येही बदल होतील आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होईल. प्रेमसंबंधात अस्वस्थता वाढेल, आणि एखाद्या गोष्टीवरून मन दुःखी राहील. आर्थिक विषयांत हळूहळू सुधार होईल. आठवड्याच्या अखेरीस वेळ अनुकूल होत जाईल. तुम्ही सुंदर भविष्यासाठी काही प्लॅनिंग कराल.

मूलांक २ : प्रेमसंबंध दृढ होतील

मूलांक २ : प्रेमसंबंध दृढ होतील

आर्थिक विषयांत वेळ अनुकूल राहील आणि तुम्हाला कोठून तरी अडकलेले पैसे हाती येतील. कोर्टकचेरीच्या विषयात धनलाभ होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमजीवनासाठी वेळ चांगली आहे. कार्यक्षेत्रात या आठवड्यात काही मतभेद होतील. हातातील प्रोजेक्टबद्दल मनात चिंता राहील. आठवड्याच्या अखेरीस अंतर्ज्ञानानुसार निर्णय़ घेतले तर चांगले फळ मिळेल. प्रेमविवाहाशी संबंधित शुभवार्ता मिळेल.

मूलांक 3: आठवड्याच्या अखेरीस विश्वासघात होण्याची शक्यता

मूलांक 3:  आठवड्याच्या अखेरीस विश्वासघात होण्याची शक्यता

आर्थिक विषयांत वेळ अनुकूल राहील आणि धनलाभाची स्थिती बनेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांच्या म्हणण्याकडे दुलर्क्ष करू नका. प्रेमसंबंधात थोडा आळस जाणवेल, आणि काही कारणाने कष्ट वाढतील. आठवड्याच्या अखेरीस कोणी तरी तुमचा विश्वासघात करू शकतो.

मूलांक ४: नवीन प्रोजेक्ट मिळवण्यात यश

मूलांक ४:  नवीन प्रोजेक्ट मिळवण्यात यश

कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्ही एका नव्या सुरुवातीच्या दिशेने जीवनात पुढे जाल. एखादा नवीन प्रोजेक्ट जीवनात यश घेऊन येईल. प्रेमसंबंधात आपापसांतील नाते दृढ होईल, आणि प्रेमजीवनात शुभयोग बनताना दिसत आहेत. या आठवड्यात धनलाभाची परिस्थिती आकस्मिकरीत्या बनत जाईल आणि आठवड्याच्या उत्तरार्धात अधिक लाभ होईल. आठवड्याच्या अखेरीस प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक ५ : सुखाची आणि दुःखाची बातमी मिळेल

मूलांक ५ : सुखाची आणि दुःखाची बातमी मिळेल

कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि हातातील प्रोजेक्टच्या माध्यमातून यश मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. आर्थिक लाभ चांगले राहतील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत एखाद्या बातमीमुळे मन दुःखी होईल. आठवड्याच्या अखेरीस अनुकूल स्थिती राहील प्रेमात वाढ होईल.

मूलांक ६ : सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असाल

मूलांक ६ : सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असाल

कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट या आठड्यात मिळू शकतो. या आठवड्यात लाभाची स्थिती प्रबळ होईल आणि धनवृद्धीच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम दृढ होईल आणि प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात सुखद बातमी मिळेल. आठवड्याच्या अखेरीस जीवनात सुखसमृद्धीचे शुभसंयोग साकारतील आणि सेलिब्रेशनचा मूड राहील.

मूलांक ७ : प्रेमसंबंधात अस्वस्थता राहील

मूलांक ७ : प्रेमसंबंधात अस्वस्थता राहील

कार्यक्षेत्रातील कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्यासाठी त्रासदायक ठरले. आर्थिक विषयांत खर्च जास्त राहील, तसेच गुंतवणूक सांभाळण्याची आवश्यकता आहे. प्रेमसंबंधात अस्वस्थता राहील आणि मन मलिन राहील. आठवड्याच्या अखेरीस एखादी सुखद वार्ता मिळू शकेल.

मूलांक ८ : कार्यक्षेत्रात प्रगती होईल

मूलांक ८ :  कार्यक्षेत्रात प्रगती होईल

कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि भागीदारातील केलेला प्रोजेक्ट या आठवड्यात तुम्हाला शुभफल देणारा आहे. आर्थिक विषयात वेळ अनुकूल राहील आणि धनलाभाची प्रबळ स्थिती बनत आहे. आर्थिक विषयांत केलेला प्रवास तुम्हाला शुभ फलदायी राहील. प्रेमसंबंधात अंतर वाढेल. आठवड्याच्या अखेरीस हळूहळू परिस्थिती अनुकूल होत जाईल.

मूलांक ९ : ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने लाभ

मूलांक ९ :  ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने लाभ

आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल राहील आणि धनलाभाचे चांगले योग या आठवड्यात बनत आहेत. कार्यक्षेत्रा बहुआयामी दृष्टिकोन ठेवा अन्यथा कष्ट वाढू शकतील. ज्येष्ठ आणि वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने धनलाभ होईल. प्रेमसंबंधात हळूहळू वृद्धी होत जाईल. आठवड्याच्या अखेरीस प्रेमसंबंधात वृद्धी होईल आणि तुम्ही जीवनातील आणखी एका मुक्कामाच्या दिशेने मार्गक्रमण कराल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.