Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला OnePlus चा आगामी फोन; कमी किंमतीत दमदार फीचर्स

11

OnePlus लवकरच एक स्वस्त 5G फोन लाँच करणार आहे. कंपनीनं याचा टीजर देखील शेयर केला आहे. OnePlus Nord CE 4 Lite 5G भारतात लाँच केला जाणार आहे. हा डिवाइस 18 जूनला सादर केला जाईल. याची एक मायक्रोसाइट देखील OnePlus नं जारी केली आहे. Amazon वर याच्या लिस्टिंगवरून डिवाइसच्या नावाचा खुलासा झाला आहे. या फोनबाबत कंपनीनं जास्त माहिती दिली नाही. यात फ्लॅट एज असलेली डिजाइन मिळेल. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.

OnePlus Nord CE 4 Lite मध्ये काय असेल खास?

वनप्लसनं या फोनचा टीजर जारी केला आहे. कंपनीनं याच्या टीजर मध्ये लिखा ‘Your All-day Entertainment Companion’. अशी टॅगलाइन देऊन एंटरटेनमेंटच्या N ला ब्लू कलर दिला आहे, त्यामुळे ब्लू कलर व्हेरिएंटची शक्यता वर्तवली जात आहे.असा दिसेल सर्वात मोठी बॅटरी असलेला वनप्लस फोन; लाँचपूर्वीच लीक झाली डिजाइन

टीजरवरून स्पष्ट झालं आहे की या फोनमध्ये फ्लॅट एज असलेली डिजाइन मिळेल. Amazon च्या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की OnePlus Nord CE 4 Lite कंपनी 8GB RAM + 128GB स्टोरेजसह लाँच करू शकते. हा डिवाइस मेगा ब्लू कलरमध्ये येईल. हा फोन 18 जूनला संध्याकाळी 7 वाजता लाँच होईल.

लीक झालेली माहिती

OnePlus Nord CE 4 Lite CPH2621 मॉडेल नंबरसह दिसला आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, या हँडसेटमध्ये 5430mAh ची बॅटरी आणि 80W Super VOOC चार्जिंग मिळू शकते. रिपोर्ट्सनुसार, हा फोन चीनमध्ये लाँच झालेल्या एका डिवाइसचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

यात 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो, जो Full HD+ रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 Nits पीक ब्राइटनेससह येईल. यात ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याचा मेन कॅमेरा 50MP चा असेल. फ्रंटला कंपनी 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. याचे फीचर्स अद्याप अधिकृतपणे समोर आले नाहीत.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.