Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुमच्या डिजिटल डॉक्युमेंट्सला असे लावा पासवर्डचे कुलूप, शेअर करतांना ही काळजी घेतल्यास टळेल मोठा धोका

15

डिजिटल युगात आपल्या महत्वाच्या डॉक्युमेंटसना सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी पासवर्ड प्रोटेक्शन हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजच्या काळात जर तुम्ही पासवर्ड शिवाय पीडीएफ शेअर करता, तर कोणताही व्यक्ती त्याचा गैरवापर करू शकतो. या लेखात आपण या प्रोसेसचे महत्त्व आणि तुमची खाजगी फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड कशी कराल ते जाणून घेऊया.

पूर्वी चोर पैसे आणि दागिने चोरी करायचे, परंतु आता डिजिटल चोर आपल्या डेटा आणि महत्वाच्या माहितीची चोरी करतात. यामुळे बँकिंग फ्रॉडसारख्या घटनांना वाव मिळतो. डिजिटल युगात पीडीएफ चोरीच्या घटना वाढत आहेत. म्हणूनच बँकिंग क्षेत्रात प्रायव्हेट डॉक्युमेंटस डिजिटल स्वरूपात पाठवताना ते पासवर्डने सुरक्षित ठेवले जातात. अशा पीडीएफला पासवर्ड असल्यामुळे चोर त्यांना उघडू शकत नाहीत.

पासवर्ड प्रोटेक्शनचे फायदे

बँकिंग पीडीएफच्या तुलनेत तुमचे प्रायव्हेट पीडीएफ पासवर्डने सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी Adobe Acrobat सारख्या टूल्सचा वापर करावा. आपले डॉक्युमेंटस सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड हा एक मजबूत उपाय आहे.

पीडीएफला पासवर्ड प्रोटेक्टेड कसे करावे?

  • सर्वप्रथम Adobe Acrobat वेबसाइटवर जा
  • Tools मेनू मध्ये Protect पर्याय निवडा
  • Incrypt with password वर क्लिक करा
  • यानंतर तुम्हाला हवा तो पासवर्ड एंटर करा
  • बटन क्लिक करून कंफर्म करा
  • नंतर फाइल सेव्ह करा

सिंपल ड्रॅग आणि ड्रॉप स्टेप्स

  • Adobeच्या https://www.adobe.com/in/acrobat/online/password-protect-pdf.html या लिंकवर क्लिक करा
  • फाइल ड्रॅग आणि ड्रॉप करा
  • पासवर्ड एंटर करा आणि कंफर्म करा
  • फाइल डाउनलोड करा किंवा Sign in करून शेअर करा

पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ हे पेड फीचर आहे. काही पीडीएफसाठी फ्री ट्रायल दिली जाते, त्यानंतर सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. डिजिटल डॉक्युमेंटसना पासवर्डने सुरक्षित ठेवणे हे अत्यावश्यक आहे. यामुळे आपल्या महत्वाच्या माहितीची चोरी होण्याचा धोका टळतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक महत्वाच्या पीडीएफला पासवर्ड प्रोटेक्शन देणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.