Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Rise In India’s Nuclear Weapons:आण्विक शस्त्रांत भारताने पाकिस्तानला टाकले मागे, जाणून घ्या जगभरात कुणाकडे आहे किती शस्त्रसाठा ?
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्युट (SIPRI) या स्विडनस्थित स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांकडील आण्विक शस्त्रांच्या साठ्यांचा अभ्यास केला आहे.यामध्ये भारताकडील आण्विक शस्त्रांमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत वाढ झाल्याचे नमूद केले आहे.
भारताकडे मागील वर्षी असलेल्या आण्विक शस्त्रांमध्ये ८ शस्त्रांची वाढ झाली आहे.मागील वर्षी ही संख्या १६४ होती ती आता १७२ वर पोहोचली आहे.यानुसार भारताकडे आता पाकिस्तानपेक्षा दोन आण्विक शस्त्रे वाढली आहेत. परंतु भारतातील सर्व शस्त्रे ही तशीच ठेवली आहेत.त्यांना कुठेही तैनात करण्यात आलेले नाही.
पाकिस्तान कडे किती आण्विक शस्त्रे आहेत ?
पाकिस्नात कडील आण्विक शस्त्रांचा विचार करता त्यांच्याकडे ६० ते ३२० किमी मारा करु शकतील अशी नस्त्र,हत्फ,गजनवी आणि अब्दाली ही कमी अंतराची क्षेपनास्त्रे आहेत. तर गौरी आणि शाहीन ही मध्यम माऱ्याची दोन क्षेपनास्त्रे आहेत. त्यांची मारक क्षमता ९०० ते २७०० किमी आहे.या दोन क्षेपनास्त्रांनी जर भारतावर हल्ला झाला तर दिल्ली,अहमदाबाद,जयपूर,मुंबई,पुणे,नागपूर,भोपाळ आणि लखनऊ ही शहरे या हल्ल्याने प्रभावित होवू शकतात. यात जर आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर झाला तर मोठ्या प्रमाणात विध्वंस होवू शकतो.
भारताची आण्विक ताकद किती ?
भारताकडे ३५० किमी मारक क्षमता असलेले पृथ्वी हे कमी अंतराचे क्षेपनास्त्र आहे.तर अग्नी १ याची क्षमता ७०० किमी आहे.अग्नी २ हे २००० किमी तर अग्नी ३ हे ३००० किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.अग्नी ५ हे भारताचे अत्याधुनिक क्षेपनास्त्र असून त्याची क्षमता ५००० ते ७५०० किलोमीटर आहे. याचा वापर करायची वेळ आल्यास पाकिस्तानातील सर्व प्रमुख शहरे अग्नी ५ च्या निशाण्यावर येवू शकतात. भारताने पाकिस्तानवर जर अनुबॉम्बचा प्रयोग केला तर रावळपिंडी,लाहौर,इस्लामाबाद,नवशेरा आणि कराची ही शहरे पुर्णपणे उध्वस्त होवू शकतात.
भारत आणि पाकिस्तानची आण्विक निती
आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापराबाबत जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांनी तेथील परिस्थितीनुसार वेगवेगळी धोरणे अवलंबिली आहेत.भारताने १९९९ मधील दुसऱ्या पोखरण अनुचाचणीनंतर NO FIRST USE (पहिल्यांदा वापर नाही) या तत्वाचा अंगिकार केला आहे. याअंतर्गत भारत केवळ शत्रुकडून हल्ला झाला तरच तो आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर करेल. परंतु पाकिस्तान अशा कोणत्याच नितीचा अंगिकार करत नाही. पाकिस्तानमध्ये आण्विक शस्त्रांचा वापर हा पुर्णता तेथील सैन्यदलाच्या मर्जीवर अवलंबून आहे जे अत्यंत धोकादायक आहे.
आण्विक शस्त्रास्त्रांची जागतिक स्थिती काय ?
रशियाने जवळपास ४३८० पैकी १७१० आण्विक शस्त्रे ही क्षेपनास्त्रे तसेच फायटर जेट्समध्ये हल्ल्यासाठी तयार ठेवली आहेत. तर अमेरिकेकडे असलेल्या ३७०८ आण्विक शस्त्रास्त्रांपैकी १७७० हत्यारे ही कोणत्याही परिस्थितीत हल्ला झाल्यास प्रत्युत्तरादाखल तैनात आहेत. फ्रान्सकडे असलेल्या एकूण २९० शस्त्रांपैकी २८० ही तैनात आहेत.तर इंग्लंडने १२० आणि चीननेही २४ आण्विक हत्यारे ही सज्ज ठेवली आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या इस्त्रायल-गाझा तसेच रशिया-युक्रेन यांच्यामधील संघर्षाने जगाला पुन्हा युद्धाच्या पायरीवर आणून ठेवले आहे. ज्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. त्यात आण्विक शस्त्रांच्या वाढत्या संख्येवर बोलताना SIPRI या संस्थेच्या डायरेक्टर यांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या पाच वर्षांमध्ये शस्त्रास्त्रांवरील हा वाढता खर्च लोकांमध्ये भय उत्पन्न करणारा आहे.