Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Ace 3 Pro: लॅपटॉपपेक्षा दुप्पट रॅमसह आला वनप्लसचा फोन; सर्वात मोठी बॅटरीही सोबत

10

OnePlus नं अखेरीस चीनी बाजारात OnePlus Ace 3 Pro सादर केला आहे. OnePlus Ace 3 Pro मध्ये 6.78 इंचाचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. काही दिवसांनी हा हँडसेट भारतात OnePlus 13R म्हणून सादर केला जाऊ शकतो. पुढे आम्ही तुम्हाला OnePlus Ace 3 Pro च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

OnePlus Ace 3 Proची किंमत

OnePlus Ace 3 Pro च्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,199 युआन (जवळपास 36,730 रुपये), 16GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3499 yuan (जवळपास 40,170 रुपये), 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3799 युआन (जवळपास 43,610 रुपये), 24GB + 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4399 युआन (जवळपास 50,500 रुपये), 16GB + 512GB सिरॅमिक स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 45,905 रुपये) आणि 24GB + 1TB सिरॅमिक स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4699 युआन (जवळपास 53,950 रुपये). या स्मार्टफोनची विक्री 3 जुलैला सुरु होईल. हा स्मार्टफोन तीन स्टँडर्ड कलर्स टायटेनियम मिरर सिल्व्हर, ग्रीन फील्ड ब्लू आणि सुपरकार पोर्सिलेन कलेक्शनमध्ये येतो. तसेच एक लिमिटेड-व्हर्जन सुपरकार पोर्सिलेन कलेक्टर व्हर्जन देखील उपलब्ध आहे.

OnePlus Ace 3 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace 3 Pro मध्ये 6.78 इंचाचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2780×1264 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz, 4500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 100% DCI-P3 कलर गमुट आहे. डॉल्बी व्हिजन असलेला हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus 2 सह येतो. OnePlus Ace 3 Pro मध्ये 6100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 100W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. फोन IP65 रेटिंगसह येतो, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून काहीप्रमाणात सुरक्षित राहू शकतो. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्टिरिओ स्पिकरसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित ColorOS 14.1 वर चालतो.

कॅमेरा सेटअप पाहता OnePlus Ace 3 Pro च्या मागे f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा सोनी IMX890 प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा Sony IMX355 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा Howe OV02B मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला f/2.4 अपर्चरसह 16 मेगापिक्सलचा Samsung S5K3P9 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus नं Ace 3 Pro मध्ये आपली सेकंड जेनरेशन टायगॉन्ग कूलिंग सिस्टम दिली आहे. या नवीन सिस्टममध्ये एक नवीन 9126 मिमी² 10,000 लेव्हल व्हीसी हीट डिसिपेशन एरियाचा समावेश आहे. इनोव्हेटिव्ह ड्युअल गोल्डन गेमिंग अँटीनामुळे स्टेबल गेमिंग अनुभव मिळेल.

OnePlus Ace 3 Pro मध्ये Adreno 750 GPU सह Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB RAM, 16GB RAM आणि 24GB LPDDR5X RAM देण्यात आली आहे. तसेच 256GB/512GB/1TB UFS 4.0 इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5G, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, Beidou, जीपीएस, GLONASS: G1 आणि टाइप सीचा पोर्ट देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.