Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

MP Ram Yadav : दिल्लीत साचले पाणी, ‘सपा’च्या खासदाराला कर्मचाऱ्यांनी घेतले कडेवर

9

Delhi Rain : मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीत पाणी साचले आहे, ज्यामुळे प्रशासनाची मान्सूनपूर्व कामांची पोलखोल पहिल्याच पावसात झालेली दिसते. दिल्लीतील VVIP नेत्यांच्या निवासस्थानांच्या बाहेरही पाण्याचे तळे साचल्याचे चित्र दिसले. सपाचे खासदार आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका राम गोपाल यादव यांचे घर सुद्धा पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले. यादव यांना संसदेत जाताना थेट दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना पाणी साचलेल्या भागातून उचलून घेत वाहनापर्यंत नेले म्हणजे अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांना नीट उचलून त्यांचा चारचाकीत बसवण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

शुक्रवारी दिल्लीत पहाटेपासून धो – धो पाऊस पडला, परिणामी अनेक भाग जलमय झाले. मुसळधार पावसाने सपा नेते राम गोपाल यादव यांच्या निवासस्थानासह मंत्री आणि खासदारांची घरेही सोडली नाहीत. दिल्लीतील नेत्यांच्या घराबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खासदार यादव यांनी संसदेच्या कामकाजासाठी निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पाणी साचल्याने संसदेत जाण्यासाठी मोठी अडचण आली.
दिल्लीत पावसाचा हाहाकार! विमानतळाचे छत कोसळले, एकाचा मृत्यू पाच जण जखमी

यानंतर राम गोपाल यादव यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने घराबाहेर पडले. दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांचा कारपर्यंत उचलून नेले, आणि अलगद त्यांना कारमध्ये बसवले त्यानंतर राम यादव यांनी संसदेपर्यंतचा प्रवास सुरु केला. पावसाची स्थिती पाहून राम गोपाल यादव म्हणाले, ” NDMC अशा परिस्थितीसाठी कधीच तयार राहत नाही, यावेळी पाऊस खूप उशिरा झाला, परंतु तरीही, नाल्यांची साफसफाई झाली नाही.” असे बोलत त्यांनी एनडीएमसीवर ताशेरे ओढले.


दिल्लीतील पावसाच्या आपत्तीजनक परिस्थितीवर भाष्य करत यादव म्हणाले, “या परिसरात अनेक मंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार राहतात, गृह राज्यमंत्री, ज्यांच्या अंतर्गत NDMC येते, ते देखील येथे राहतात, पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती झाले जिथे आम्ही राहतोय तिथे इतके पाणी साचले की बाहेर पडण्यासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागले” जर अशी परिस्थती नेत्यांसाठी असेल तर सर्वसामान्य कसे जगत असतील असा सवाल यादव यांनी केलाय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.