Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कडाक्याचा उन्हाळ्यानंतर मोठ्या आतुरतेने आपण सर्व पावसाची वाट बघत असतांना अखेरीस पाऊस सुरु होऊन हवेत गारवा आला. पण या सुखद गारव्याबरोबरच घरात येऊ लागले आहेत बारीक बारीक कीटक! बऱ्याच किड्यांना या ऋतूत पंख फुटल्याने त्यांचीही संख्या वाढते.
अशावेळी घरातील लाईट कमी करणे, खिडक्या- दरवाजा लावून ठेवणे असे अनेक उपाय आपण करून बघतो. पण कुठल्या न कुठल्या मार्गाने हे किडे आपल्या घरात शिरकाव करतातच. पण आता काळजी करू नका. अशा कीटकांचा नायनाट करण्यासाठी काही उपकरणे आहेत जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. ही उपकरणे इंस्टॉल केल्याने, तुमच्या घरातील जवळजवळ सर्व कीटक मरतील.
Electric Mosquito, Fly Insect Killer
हे मशीन तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता, किचन, बेडरूम, मुलांची खोली, रेस्टॉरंट, आऊटडोअर, इनडोअर अगदी कुठेही वापरू शकता. तुम्हाला हा ट्रॅप किलर एलईडी लाईट अतिशय कमी किमतीत मिळत आहे. तुम्ही Amazon वरून 70 टक्के सूट घेऊन फक्त 1,199 रुपयांमध्ये हे खरेदी करू शकता.
iBELL M23IK Insect Killer Machine
या मशीनची मूळ किंमत 2,890 रुपये आहे, परंतु तुम्ही Amazon किंवा कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 1,630 रुपयांच्या सवलतीसह हे खरेदी करू शकता. हे मशिन बसवल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील, कार्यालयातील किंवा बाहेरच्या परिसरातील कीटकांपासून मुक्ती मिळवू शकता.
Weird Wolf Insect Killer Machine
हे मशीन एक वर्षाच्या वॉरंटीसह येते, याद्वारे तुम्ही माशी व तत्सम कीटक दूर करू शकता. यामधील युव्ही बल्ब माशी व कीटकांसाठी सापळ्याचे काम करतो. हा प्रकाश कीटकांना आकर्षित करतो आणि त्यांना मारतो. तुम्ही हे कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळवू शकता. पण जर तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता, येथून तुम्ही 1,699 रुपयांमध्ये डिस्काउंटसह हे डिव्हाईस खरेदी करू शकता.
अनेक ऑनलाइन पर्याय
या मशीन्सशिवाय, तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून इतर कीटक मारणारी मशीन देखील खरेदी करू शकता. तुम्हाला ऑनलाइन अनेक पर्याय मिळत आहेत.