Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोण वापरू शकतं हे फीचर
प्रीमियम सब्सक्रायबर या इन्शुरन्सचा वापर करू शकतात. हा अॅन्युअल प्रीमियम सब्सक्रिप्शनसह उपलब्ध आहे. काही प्रीमियम प्लॅन कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना इन्शुरन्ससाठी पात्र आहेत. ज्यांच्याकडे फॅमिली प्लॅन आहे त्या युजर्सना देखील हा इन्शुरन्स कव्हर देत आहे कंपनी. तसेच जर तुमच्याकडे कोणतंही सब्सस्क्रिप्शन नसेल तर तुम्ही अपग्रेड करू शकता आणि या फिचरचा लाभ घेऊ शकता.
कसा अॅक्टिव्हेट करायचा प्लॅन
- सर्वप्रथम तुमचं ट्रूकॉलर अॅप ओपन करा.
- त्यानंतर इन्शुरन्स ऑप्शनवर जा.
- त्यानंतर अॅप सेटिंग किंवा प्रीमियम फीचर सेक्शनमध्ये फ्रॉड इन्शुरन्स ऑप्शन सेलेक्ट करा.
- त्यानंतर कव्हरेज अॅक्टिव्हेट करण्यासाठी प्रॉम्ट फॉलो करा.
ट्रूकॉलर फ्रॉड इन्शुरन्स म्हणजे काय
या सर्व्हिसमध्ये युजर्सना ऑनलाइन फ्रॉड झाल्यास 10 हजार रुपयांचा इन्शुरन्स कव्हर दिला जाईल. म्हणजे जर तुमच्यासोबत मोबाइलवरून ऑनलाइन फ्रॉड झाला आणि तुम्ही हे सिद्ध केले तर ट्रूकॉलर कडून 10 हजार रुपयांचा विमा दिला जाईल. हा विमा ट्रूकॉलर अॅपसह इंटीग्रेट केला जाईल. म्हणजे जर तुम्ही ट्रूकॉलर प्रीमियम सब्सक्रिप्शन घेतलं तर या विमा कव्हरसाठी आपोआप पात्र व्हाल.
इन्शुरन्सचा फायदा
ट्रूकॉलरचा एक मोठा युजरबेस आहे, ज्याचे जगभरात 400 मिलियन युजर आहेत, भारतात ही संख्या 285 मिलियनच्या घरात आहे. त्यामुळे ट्रूकॉलरद्वारे युजर्ससाठी इन्शुरन्स प्लॅन आणला गेला आहे. जेणेकरून युजर्सना फ्रॉडपासून सुरक्षित करता येईल. भारतात ट्रूकॉलर सब्सक्रिप्शनमध्ये साल दरसाल 50 टक्क्यांची वाढ होत आहे.