Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Whatsapp DP Define Nature : व्हॉट्सअप ‘डीपी’ सांगतो तुमचा स्वभाव ! सतत डीपी बदलता की कधीतरी? ज्योतिषशास्त्र काय सांगते? वाचा

11

Significance of DP in WhatsApp In Marathi :
डीपी अर्थात डिसप्ले पिक्चर, जगाला आपली ओळख व्हावी म्हणून व्हॉट्सअपने आपल्याला डीपीची सुविधा दिलेली आहे. जेव्हा आपण चॅटीग करतो त्यावेळी हा डीपी सगळ्यांना दिसत असतो. व्हॉट्सअपच्या जगातील आपली ओळख म्हणजे डीपी होय.

तुम्हीसुद्धा डीपी बदलत असाल किंवा एकच डीपी ठेवला असेल. काही जणांना खास प्रकारातील डीपी ठेवायला आवडतात, यावरुनच तुम्ही कसे आहात ते समजते.

वारंवार डीपी बदलणे

जर तुम्ही डीपी वारंवार बदलत असाल तर ते राहू-शुक्र कनेक्शन दर्शवते, जे आर्थिक दृष्टीने चांगले आहे. सतत डीपी बदणारे हौशी, चंचल आणि उत्साही स्वभावाचे असतात. आपल्या जीवनात काय सुरु आहे ते सतत डीपीच्या माध्यमातून दाखविण्याचा ते प्रयत्न करतात.

डीपी न ठेवणारे

<strong>डीपी न ठेवणारे</strong>

ज्या व्यक्ती डीपी ठेवत नाही त्या कुठेतरी आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्ती अंतमुर्ख असतात, छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप विचार करतात. स्वतःला आणि कुटुंबाला जपणारे असे हे लोक असतात. या लोकांना एखादं काम दिलं तर ते यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्ती दिवसरात्र कठोर मेहनत करतात.

डीपी वर कायम एकच फोटो ठेवणारे

<strong>डीपी वर कायम एकच फोटो ठेवणारे</strong>

जर तुम्ही व्हॉट्सअँपवर डीपी ठेवला आहे आणि तो बदलत नाही. कायम तो एकच डीपी असेल तर ती व्यक्ती स्थिर स्वभावाची असते. सदैव एक डीपी ठेवणारे स्वतःमध्ये रमून जाणारे असतात असे ही म्हणता येईल.

डीपी कधी तरी बदलणारे

<strong>डीपी कधी तरी बदलणारे</strong>

कधी कधी डीपी बदणाऱ्या व्यक्ती मूडी स्वभावाच्या असतात. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल किंवा इतर लोकांच्या मताची ते फारशी पर्वा करत नाही. या व्यक्ती मेहनती असतात पण त्यांच्या विचारांना योग्य मार्ग मिळायला हवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.