Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Fingerprint Lock: जर तुमच्या फोनमध्ये देखील फिंगरप्रिंट लॉक काम करत नसेल तर जाणून घेऊया हे लॉक डिलीट करण्याची सर्वात सोपी पद्धत. याचा ऑप्शन सेटिंग्स मध्ये जाऊन मिळेल. डिलीट केल्यावर तुम्ही सिक्योरिटीसाठी पिन, पासवर्ड किंवा पॅटर्नचा वापर करू शकता.
जर तुम्हाला देखील तुमच्या फोनमधील Fingerprint लॉक काढू इच्छित असाल किंवा जुना फिंगरप्रिंट लॉक रिमूव्ह करून नवीन फिंगरप्रिंट लॉक सेव्ह करू इच्छित असाल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला फोन फिंगरप्रिंट लॉक काढून टाकण्यासाठी सोपी प्रोसेस या आर्टिकलमध्ये सांगणार आहोत.
Hidden Gmail features: जी-मेलचा वापर करतांना या 5 हीडन ट्रिक्समुळे तुमचे काम होईल अधिक सोपे
अँड्रॉइड फोनमध्ये फिंगरप्रिंट लॉक कसा काढून टाकायचा
- फोनमधील फिंगरप्रिंट लॉक काढून टाकण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा.
- त्यानंतर खाली स्क्रोल-डाउन करून Security मध्ये जा.
- त्यानंतर Device Security मध्ये सर्व लॉक सिस्टम दिसतील, ज्यांचा वापर तुम्ही फोनमध्ये करत आहात.
- फिंगरप्रिंट लॉक डिलीट करण्यासाठी तुम्हाला फिंगरप्रिंटवर जावे लागेल.
- सिक्योरिटीसाठी आधी लॉक ओपन करा.
- त्यानंतर खाली Fingerprint List दिसेल.
- फिंगरप्रिंट लिस्टच्या बाजूला डिलीटचा ऑप्शन दिसेल.
- त्यानंतर या लिस्टमधील एक-एक करून सर्व फिंगरप्रिंट डिलीट करा. लक्षात ठेवा की फिंगरप्रिंट लॉक तेव्हाच हटवलं जाईल जेव्हा तुम्ही लिस्टमधील सर्व फिंगरप्रिंट डिलीट कराल.
अशाप्रकारे सहजरित्या तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून फिंगरप्रिंट लॉक काढून टाकू शकता. हे काढून टाकल्यावर तुम्ही पिन लॉक, पॅटर्न किंवा फिर फेस आयडीचा वापर करू शकता. पिन लॉक खूप जास्त लोकप्रिय सिक्योरिटी सिस्टम आहे, ज्याचा वापर अनेक लोक करतात.
लक्षात असू द्या की अँड्रॉइड फोनवरील फेस अनलॉक फिंगरप्रिंट इतकं सुरक्षित नाही त्यामुळे त्याचा वापर करताना हजार वेळा विचार करा. खासकरून तुमच्या फोनमध्ये बँकिंग अॅप्स असतील तर काळजी घ्या.