Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Extortion Scam: ICICI बँकेचा इशारा! कॉल आणि इमेल्सपासून युजर्सना सुरक्षित राहण्याचा सल्ला, असा घडतोय एक्सटॉर्शन स्कॅम

12

Extortion Scam: आयसीआयसीआय बँकेच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगार यूजर्सकडून एक्सटॉर्शनची मागणी करुन घोटाळ्यात अडकवत आहेत. या घोटाळ्यात, सायबर गुन्हेगार व्यक्ती किंवा संस्थांना मेसेजेस पाठवतात आणि सेन्सेटिव्ह आणि प्रायव्हेट माहिती लीक करण्याची धमकी देतात. हे करू नये म्हणून हे स्कॅमर्स बँकेच्या ग्राहकांकडून पैशांची मागणी करतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
युजर्सवर नवीन मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका बँकिंगशी संबंधित आहे. या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. TOI अहवालानुसार, ICICI बँकेने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार युजर्सकडून एक्सटॉर्शनची मागणी करुन घोटाळ्यात अडकवत आहेत. या घोटाळ्यात, सायबर गुन्हेगार व्यक्ती किंवा संस्थांना मेसेज पाठवतात आणि सेन्सेटिव्ह आणि प्रायव्हेट माहिती लीक करण्याची धमकी देतात. हे करू नये म्हणून हे स्कॅमर्स बँकेच्या ग्राहकांकडून पैशांची मागणी करतात. बँक ग्राहकांना ईमेल पाठवून या स्कॅमबाबत सतर्क करत आहे.

एक्सटॉर्शन स्कॅम म्हणजे काय?

एक्सटॉर्शन स्कॅमची सुरुवात ईमेलपासून होते. यामध्ये, सायबर गुन्हेगार दावा करतात की त्यांच्याकडे युजर्सचे खाजगी फोटो आणि पर्सनल डेटा आहे. आपल्या पीडितांना घाबरवण्यासाठी, हे स्कॅमर्स पैसे न मिळाल्यास हे फोटो आणि खाजगी डेटा मित्र, कुटुंब तसेच सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर लीक करण्याची धमकी देतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, सायबर गुन्हेगारांकडे असा कोणताही डेटा नसतो, परंतु यूजर्स घाबरून त्यांच्या या सापळ्यात अडकतात.

एक्सटॉर्शन स्कॅम कसा ओळखायचा?

आयसीआयसीआय बँकेने पाठवलेल्या ईमेलमध्ये असे स्कॅम ओळखण्याचे याबाबत माहिती दिली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगार हॅकरला अडकवण्यासाठी कॉल, संदेश किंवा ईमेल करू शकतात, ज्यामध्ये ते कोणत्याही सरकारी विभाग किंवा एजन्सीचे असल्याचे भासवू शकतात. सायबर गुन्हेगार त्यांच्या पीडितांना कायदेशीर कारवाई आणि अटक करण्याची धमकी देतात. मग घोटाळेबाज घाबरलेल्या बँक ग्राहकांना पैशाच्या बदल्यात प्रकरण शांत करण्याचा पर्याय देतात. सायबर गुन्हेगार हॅकरकडून पासपोर्ट तपशील, जन्मतारीख आणि बँक डिटेल्स देखील विचारू शकतात. ग्राहकांनी लवकरात लवकर पैसे भरावेत, यासाठी हे स्कॅमर्स पोलीस स्टेशनला गेल्याचे खोटे दावेही करतात.

स्वतःला असे सुरक्षित ठेवा

  1. कोणत्याही अनोळखी कॉलरने पैशाची मागणी केल्यास त्रास देऊ नका आणि कॉल करणाऱ्याला प्रतिसाद देऊ नका.
  2. भेटवस्तू, हॅम्पर, व्हाउचर किंवा वायर ट्रान्सफरद्वारे कोणालाही पेमेंट करू नका.
  3. कॉलरने दिलेला कोणतेही काँटॅक्ट डिटेल्स वापरू नका. थेट संस्थेला कॉल करून कॉलरची ओळख व्हेरीफाय करा.
  4. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नका. तसेच, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन अकाऊंट डिटेल्स, ड्रायव्हिंग लाइसेन्स आणि पासपोर्टडिटेल्स ईमेल किंवा फोनवर कोणाशीही शेअर करू नका.
  5. अनोळखी लिंकवरून येणाऱ्या ईमेलमध्ये दिलेल्या अटॅचमेंटवर क्लिक करू नका. तसेच त्यात दिलेली कोणतीही फाईल डाउनलोड करा. असे केल्याने तुमच्या डेस्कटॉपमध्ये व्हायरस एंट्री करू शकतात.
गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.