Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Plant On Mars: मंगळावर टिकू शकते ‘ही’ वनस्पती; चिनी शास्त्रज्ञांचा मोठा शोध, मंगळवासाचा रचणार पाया

12

Plant on Mars: मंगळावरील कठीण परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या वनस्पतीचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. तथापि, शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ही शक्यता व्यक्त केली आहे. संबंधित वनस्पती अंटार्क्टिका आणि मोजावे वाळवंटातही आढळते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अनेक दशकांपासून मंगळावर जीवसृष्टीची शक्यता शोधण्यात शास्त्रज्ञ व्यस्त आहेत. आता चिनी शास्त्रज्ञांनी या दिशेने एक मोठा शोध लावल्याचा दावा केला आहे. मंगळावरील कठीण परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या वनस्पतीचा शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे. हि वनस्पती म्हणजे एक प्रकारचा वाळवंटातील मॉस आहे, ज्यावरून शास्त्रज्ञांनी मंगळावरील जीवनाची शक्यता व्यक्त केली आहे.

सिंट्रिचिया कॅनिनरविस

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, या वाळवंटातील मॉसचे वैज्ञानिक नाव ‘सिंट्रिचिया कॅनिनरविस’ आहे. शास्त्रज्ञांनी याबद्दल सांगितले आहे की ते अमर्याद उष्णता, असीम थंडी आणि रेडिएशन सहन करू शकते. संशोधकांच्या टीमने म्हटले आहे की त्यांच्या अभ्यासामुळे अंतराळात वसाहत स्थापन करण्याचा पाया घातला गेला आहे. ज्यामध्ये तेथील आव्हानात्मक परिस्थितीतही टिकून राहण्यास सक्षम आणि नैसर्गिकरित्या निवडलेल्या वनस्पती असतील.

सूक्ष्मजीवांपेक्षाही जास्त क्षमता

Syntrichia caninervis बद्दल, अभ्यासात असे म्हटले गेले आहे की त्याची इन्व्हॉयरमेंटल फ्लेकजिबिलिटी (पर्यावरणीय लवचिकता) अत्यंत तणावपूर्ण वातावरणातही स्वतःला जिवंत ठेवू शकणाऱ्या सूक्ष्मजीवांपेक्षाही जास्त असल्याचे सिद्ध होते. शास्त्रज्ञ म्हणतात की, ही एक Pioneer (पाया घालणारे) वनस्पती आहे जी पृथ्वीवरून अंतराळात मानवी वस्ती वसवण्याचा पाया घालू शकते. द इनोव्हेशन नावाच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

आव्हानात्मक वातावरणाचा सामना

संशोधकांनी Syntricia caninervis बद्दलच्या लेखात नोंदवले आहे की, हे वाळवंटातील मॉस केवळ अशा वातावरणातच टिकू शकले नाही, तर ते पाण्याच्या तीव्र कमतरतेतूनही सावरले. याचा अर्थ उच्च पातळीच्या निर्जलीकरणातूनही (डिहायड्रेशन) ते स्वतःला बरे करू शकते. वनस्पती 30 दिवस उणे 196 अंश सेल्सिअसवर गॅमा किरणांच्या संपर्कात होती. 5 वर्षे ते उणे 80 अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्यात आले होते. तरीसुद्धा ते सामान्यपणे विकसित होत राहिले.

पृथ्वीच्या बाहेर अंतराळात जीवनाचा पाया

शास्त्रज्ञांच्या टीमने अभ्यासासाठी मंगळ ग्रहाप्रमाणे एक प्रेशर फील्ड तयार केले, त्यावर तेच तापमान, तेच वायू आणि तशाच अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमध्ये हे मॉस ठेवले गेले. सात दिवसांनी ते दिसले तेव्हा ते जिवंत होते. त्यामुळे मंगळाच्या आव्हानात्मक वातावरणात ही वनस्पती नक्कीच तग धरू शकेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो. या क्षेत्रात अजून सखोल संशोधन व्हायचे असले तरी, सिंट्रिचिया कॅनिनर्व्हिसच्या रूपात शास्त्रज्ञांना अशी वनस्पती सापडली आहे जी पृथ्वीच्या बाहेर अंतराळात जीवनाचा पाया घालू शकते.

नंदिता रामेश्वर थोरात

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.