Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 12 जुलै 2024: शनि आणि चंद्राचा समसप्तक योग, वृश्चिक आणि धनु राशीसह 5 राशींना नुकसान होण्याची भीती ! पाहा तुमचे राशिभविष्य
मेष आर्थिक राशिभविष्य – नवीन अधिकार मिळतील
मेष राशीच्या लोकांना भाग्यवृद्धीचा दिवस आहे आणि आज तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमची थांबलेली कामे आज पूर्ण होतील तसेच आर्थिक लाभ आणि आधिकारांत वृद्धी होईल. आज तुम्हाला लाभप्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही नवीन अधिकार मिळतील. रचानात्मक कार्यात रुची वाढेल. मुलगा, मुलगीच्या लग्नाची बोलणी पुढे सरकतील.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : कामावर लक्ष केंद्रित करा
वृषभ राशीच्या लोकांना लाभाचा दिवस आहे आणि सन्मानात वृद्धी होईल. आज सुखउपोभागाच्या साधनातही वाढ होईल आणि तुमची कामे यशस्वी होतील. आज आवश्यक साहित्यांच्या खरेदीत वेळ व्यतित होईल. आज कुटुंबात वादविवादापासून दूर राहा आणि सर्वांसोबत सन्मान आणि प्रेमाचे वातावरण टिकवून ठेवा. अनावश्यक फालतू खर्च टाळावेत, आणि कामावर लक्ष केंद्रित करा.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल
मिथुन राशीच्या लोकांना लाभ होतील आणि कार्यालयात तुम्हाला प्रत्येक कामात सन्मान मिळेल. आज सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा यात वाढ होईल आणि नशिबाची पूर्ण साथ लाभेल. व्यापारात भागीदारासोबत संबंध मधुर होतील आणि आपापसांतील संबंधामुळे लाभ होतील. पत्नीकडील नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. आज उधारी कमी होईल आणि तुम्ही पैशांची बचत करू शकाल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : उत्तम संपत्ती प्राप्तीचे योग
कर्क राशीच्या लोकांना उत्तम संपत्तीच्या प्राप्तीचे योग आहेत, तसेच भाग्य वृद्धी झाल्याने थकलेले पैसे हाती येतील. नवीन संबंधाना स्थायी स्वरूप येईल आणि तसेच जुन्या संबंधातून लाभ होतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते, प्रयत्नशील राहावे. प्रियजनांसोबत आनंदात वेळ जाईळ. मानसिक तणाव आणि भ्रमाची स्थिती यामुळे दैनिक कामात काही अडथळे येतील आणि तुमची कामे थांबू शकतात.
सिंह आर्थिक राशिभविष्य : टीमवर्कमधून लाभ प्राप्ती
सिंह राशीच्या लोकांना लाभाचा दिवस आङे आणि तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल. आज तुम्हाला आत्मसंतुष्टी मिळेल. काही वेळा इतरांचे विचार ऐकण्यात काही अडचण असू नये. ऑफिसमध्ये तुमच्या टीमचे चांगल्या प्रकारे नेतृत्त्व कराल, लोक तुमचे बोलणे ऐकतील. टीमवर्कच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर उपाय शोधाल, तुम्हाला आज लाभ होतील.
कन्या आर्थिक राशिभविष्य : कार्यालयात आकस्मिक बदल
कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ होतील आणि तुम्हाला नव्या संधी मिळतील. आज एखाद्या जुन्या वादाचा अंत होईळ. तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण राहील याची काळजी घ्या. कार्यलयात आकस्मिक एखाद्या नव्या बदलामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. महिला सहकारी आणि अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. धनवृद्धीचे योग आहेत, तुम्हाला लाभ मिळतील.
तूळ आर्थिक राशिभविष्य : नवी गुंतवणूक नको
तूळ राशीच्या लोकांना लाभ होतील आणि व्यापारातही नफ्याचे योग बनत आहेत. धनवृद्धी होईल आणि आकस्मिक काही लाभ होतील. आज कोणतीही नवी गुंतवणूक करू नका, त्यातून नुकसान होऊ शकते. कायदेशीर बाबतीत विचार करून मग निर्णय घ्या. घरातील रखडलेली कामे पूर्ण करण्याची आज चांगली संधी आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : जबाबदाऱ्या पार पाडाल
वृश्चिक राशीच्या लोकांना दिवस आनंदाचा आहे. व्यावसायिक बाबतीत तुम्हाला कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागू शकतो. आज देवाणघेवाणीपासून दूर राहा आणि तुमच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. दिवसाच्या उत्तार्धात मैत्रिणींसोबत आनंदात वेळ व्यतित होईल. कार्यक्षेत्र तसेच घरी सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. सायंकाळी कुटुंबीयांसोबत आनंदात वेळ घालवाल.
धनू आर्थिक राशिभविष्य – पैशांची बचत करा
धनू राशीच्या लोकांना लाभ होतील आणि करिअरमध्ये यश प्राप्तीचे योग आहेत. जुनी उधारी आज भागवाल. कार्यक्षेत्रात तुमच्या सल्ल्याचे स्वागत होईल. आवश्यक घरगुती सामनाची खरेदी करावी लागेल. खर्च करताना खिश्याचा विचार करा. सायंकाळाचा वेळ कुटुंबाला द्याल. अनवाश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या आणि थोड्या पैशाची बचत करा.
मकर आर्थिक राशिभविष्य : दिवस संमिश्र
मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र राहील आणि तुम्हाला आवश्यक कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते. भाऊ किंवा बहिणीच्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक भेटतील. आज कोणी उधार पैसे मागितले तर देऊ नका, पैसे बुडू शकतात आणि तुमचे नुकसान होऊ शकते.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : पूण्य कार्यावर पैसे खर्च होतील
कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत. सक्रीय राजकारणात सहभागाचे योग आहेत. तुमच्याशी स्पर्धा करण्यात तुमचे विरोधक मागे पडतील. दिवसाच्या उत्तरार्धात शुभ खर्च होतील आणि कीर्ती वाढेल. पूण्य कार्यावर पैसे खर्च होतील. आज कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्याल आणि घरातील सर्व कामे पूर्ण कराल.
मीन आर्थिक राशिभविष्य : धनसन्मानात वृद्धी होईल
मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभाचा दिवस आहे. आज संपत्ती प्रदान कराल. हरवलेले पैसे हाती येतील आणि थांबलेली कामे पूर्ण होतील. मंत्र शक्तीच्या बळावर आज कठीण समस्यांवर उपाय शोधाल. आज व्यापारात यश मिळेल. धन, सन्मानात वृद्धी होईल आणि तुमची कामे संपन्न होतील.