Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Smartphone Volume: जर तुमच्या स्मार्टफोनचा आवाज कमी झाला आहे का? तर तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्सच्या माध्यमातून व्हॉल्युम ठीक करू शकता. अँड्रॉइड फोनमध्ये उपयुक्त ठरते ही ट्रिक. इथे जाणून घेऊया कशाप्रकारे.
आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये Android स्मार्टफोनची व्हॉल्युम वाढवण्यासाठी सोपी पद्धत सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागणार नाही. कारण अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये इन-बिल्ट सेटिंग आहे, जिच्या मदतीनं तुम्ही फोनचा कमी झालेला आवाज वाढवू शकता.
Dark web report: तुमचे पर्सनल डिटेल्स डार्क वेबवर लीक तर झाले नाही ना? पाहा हे चेक करण्याचा सोपा मार्ग
स्मार्टफोनचा आवाज कसा वाढवायचा
- तुमच्या स्मार्टफोनचा आवाज कमी झाला असेल तर व्हॉल्युम वाढवण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये Settings ओपन करा.
- त्यानंतर खाली स्क्रोल-डाउन करून Sounds and Vibration चा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.
- इथे तुम्हाला या सेक्शनमध्ये सर्वात खाली स्क्रोल-डाउन करून Ear- Customized Sound effects चा ऑप्शन मिळेल.
- त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर Ear- Customized Sound effects चा टॉगल ऑन करा.
- हा टॉगल ऑन केल्यानंतर तुम्हाला अनेक Age असलेले ऑप्शन दिसतील.
- जर तुमचं वर 30 पेक्षा कमी असेल तर Under 30 year Old सेक्शनची निवड करू शकता.
- जर तुम्हाला तुमच्या आई-बाबांच्या फोनचं व्हॉल्युम वाढवायचं असले तर तुम्ही 30 ते 60 वर्षांपर्यंतचा ऑप्शन निवडू शकता.
- तसेच, आजी-आजोबांच्या फोनसाठी Above 60 Years असलेल्या ऑप्शनवर क्लिक करू शकता.
या सेटिंग्सच्या माध्यमातून तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनचा व्हॉल्युम नीट होईल. जर तुमच्या फोनचं व्हॉल्युम कमी झालं असे तर तुम्ही या सेटिंग्सचा वापर करू शकता. एक लक्षात असू द्या की कधीही चुकीचं वय निवडू नका. कारण जर तुम्ही कमी वयात 60 वर्षावरील साउंड सेट केला तर त्यामुळे तुमच्या श्रावण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.