Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य,18 जुलै 2024 : मूलांक 4 कामात अडथळे ! मूलांक 8 संयमाने अडचणींचा सामना करा ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.
मूलांक 1 – थकलेले पैसे हाती येतील
मूलांक 1 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला आहे. तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस सरस आहे. तुम्हाला आज अचानक धनप्राप्ती होईल. आज तुमचे थकलेले पैसे पुन्हा हाती येण्याचे योग आहेत. व्यापारासाठीही आजचा दिवस चांगला आहे. व्यापारासाठी काही नवे मार्ग खुले होताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही फार आनंदीत असाल. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबातीस एखाद्या सदस्यासोबत तुमचा वाद होईल. त्यामुळे तुम्ही आज शांत राहा आणि भाषा सौम्य ठेवा. जोडीदारासोबत संबंध मधुर ठेवा, त्यामुळे तुमचा दिवस चांगला होईल.
मूलांक 2 – गुंतवणूक टाळा
मूलांक 2 असलेल्यांना आजचा दिवस चांगला नाही. पैशांच्या दृष्टिकोनातूनही आजचा दिवस फारसा चांगला नाही. पैशांच्या बाबतीत तुम्ही चिंतेत असाल. आज कोठेही पैशांची गुंतवणूक करू नका, असा तुम्हाला सल्ला राहील. आज आर्थिक नुकसान होण्याचे योग बनत आहेत. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे तर आज एखाद्या नवीन कार्याचा आरंभ करू नका. जोडीदारासोबतही आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. उपाय म्हणून आज शनी मंदिरात जाऊन शनीला तेल वाहावे, त्यामुळे तुमच्या अडचणी कमी होतील आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
मूलांक 3 – आध्यात्मिक कार्यावर खर्च कराल
मूलांक 3 असलेल्यांना आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही विचार केलेली कामे पूर्ण कराल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही आध्यात्मिक कार्यात पैसे खर्च कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. व्यापारी लोक आज काही नवीन सुरुवात करू इच्छित असतील, तर आज दिवस अनुकूल राहील. कुटुंबाचा विचार करता, कुटुंबीयांसोबत आजचा दिवस चांगला व्यतित होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत आज एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत आज सुखद दिवस व्यतित होईल. एकूण आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 4 – प्रत्येक कामात अडथळे येतील
मूलांक 4 असलेल्यांना वेळ अनुकूल नाही. आज प्रत्येक कामात तुमच्या अडचणी वाढतील आणि तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल. आज तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात अडथळे येतील. आर्थिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस चांगला नाही. आज कोठेही पैशांची गुंतवणूक करताना सावध राहा. व्यापारी वर्ग व्यापारसाठी काही नवीन विचार करत असाल तर आज काहीही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक बाबतीत आज कुटुंबातील एकाद्या सदस्यासोबत वाद होतील. त्यामुळे तुम्हाला शांत राहिले पाहिजे आणि कटू वचन टाळले पाहिजे. आज जोडीदाराला भेट वस्तू दिल्याने तुम्हाला काही लाभ होऊ शकतात.
मूलांक 5 – गुंतवणूक विचारपूर्वक करा
मूलांक 5 असलेल्यांना आजचा दिवस सामान्य राहील. पैशांची गुंतणूक अत्यंत विचारपूर्वक करा. पैशांच्या बाबतीत प्रत्येक विषयात तुम्हाला आज अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे तर, व्यापार विस्तारासाठी तुम्ही नवीन पावले उचलू शकता. एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीचा सल्ला घेतला तर तुम्हाला फार फायद्याचे ठरेल. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील, परंतु जोडीदारासोबत वेळ फारशी अनुकूल नाही. आज संयम ठेवा आणि चिडू नका, त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्यात मदत होईल.
मूलांक 6 – धनलाभाचा योग
मूलांक 6 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला राहील. पैशांच्या दृष्टिकोनातूनही आजचा दिवस सरस आहे. आज पैशांची आवक होण्याचे योग आहेत. आज तुमचे थांबलेले पैसे हाती येण्याचेही योग बनत आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरी एखादी महिला तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे कोणत्याही महिलेला तुमच्या कामात हस्तक्षेप करू देऊ नका, आणि त्यांच्यापासून योग्य ते अंतर ठेवा. कुटुंबाचा विचार करता आज तुमचा दिवस सामान्य राहील. कुटुंबातीस सदस्यांसोबत घरी एखाद्या उत्सवाचे आयोजन कराल. जोडीदारासोबत आज दिवस सुखाचा राहील.
मूलांक 7 – वडिलांच्या सल्ल्याने गुंतवणूक कराल
मूलांक 7 असलेल्यांना आजचा फार चांगला राहील. आज तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील. आज कामाबद्दल तुमच्या मनात उछ्च विचार असतील आणि तुम्ही हे विचार आज पूर्ण ही कराल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. वडिलांचा सल्ला घेऊन पैशांची गुंतवणूक कराल तर तुम्हाला फार चांगले लाभ मिळतील. व्यापारी वर्गालाही आज लाभ होतील. कुटुंबात अनावश्यक विषयांवरून वाद होतील. जोडीदारासोबत दिवस सामान्य जाईल.
मूलांक 8 – अडचणींना तोंड द्यावे लागेल
मूलाकं 8 असलेल्यांना आज दिवस अनुकूल नसेल. आज तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल. तुम्ही विचार केलेली कामे बिघडतील आणि त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य नाही. आज पैसे गुंतवू नका त्यामुळे पैसे अडकू शकतात. कोणतेही काम अविचाराने करू नका. कौटुंबिक दृष्टिकोनातून आज दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत संबंध मधुर राहतील.
मूलांक 9 – जोडीदारासोबत ताळमेळ ठेवा
मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस चांगला नाही. आज तुम्हाला वैयक्तिक जीवनात विशेष लक्ष द्यावे लागेल. आज तुम्हाला मार लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी आणि वाहन चालवताना दक्ष राहावे. आज हनुमानाच्या मंदिरात जाऊन डोके टेकून, दिवा लावावा आणि हनुमानाचा आशिर्वाद घ्यावा, आणि त्यानंतर घरातून बाहेर पडाले. आज पैशांचा वापर फार काळजीपूर्वक करा. कुटुंबातील सदस्यांसोबत राहाणे फायद्याचे राहील. जोडीदारासोबत ताळमेळ ठेवा, आवश्य लाभ होतील.