Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक अंकशास्त्र, 22 ते 28 जुलै 2024: मूलांक 3 धनलाभाचा योग ! मूलांक 9 मानसन्मान वाढणार ! जाणून घ्या, मूलांक 1 ते 9 साठी आठवडा कसा असेल?
मूलांक 1 ( जन्म तारीख 1, 10 , 19 , 28): अनावश्यक वादापासून दूर राहा
आर्थिक विषयात हळूहळू सुधार होत जाईल आणि धनलाभाची स्थिती बनेल. कार्यक्षेत्रात अहंकारामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो, तसेच अस्वस्थता वाढू शकते. प्रेमसंबंधात एखाद्या महिलेमुळे आपापसांत मतभेद निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस अनावश्यक वादापासून दूर राहिला तर चांगले परिणाम समोर येतील.
मूलांक 2 (जन्म तारीख 2,11,20,29): आर्थिक बाबतीत बंधनं जाणवतील
या आठवड्यात कार्यक्षेत्रात हळूहळू उन्नतीचे योग बनत जातील, आणि हातातील प्रोजेक्ट प्रगती करतील. आर्थिक बाबतीत काही बंधनं जाणवतील, त्यामुळे तुम्हाला खुलून गुंतवणून करता येणार नाही. प्रेमसंबंधात थोडी जोखीम पत्करून निर्णय घेतले तर चांगले परिणाम समोर येतील. आठवड्याच्या अखेरीस तुम्ही जितके लक्ष केंद्रित करून निर्णय घ्याल तेवढे जास्त यश मिळेल.
मूलांक 3 (जन्म तारीख 3,12,21,30): धनलाभाची स्थिती प्रबळ बनेल
अर्थिक विषयात वेळ अनुकूल आहे आणि धनलाभाची प्रबळ स्थिती बनताना दिसेल. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. कार्यक्षेत्रात संयमाने निर्णय घेणे योग्य होईल. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम वाढत जाईल, तसेच तुम्ही हट्टीपणा सोडून संवादातून विषय सोडवण्याकडे लक्ष द्यावे. आठवड्याच्या अखेरीस जवळच्या व्यक्तींसोबत सुखद वेळ व्यतित कराल.
मूलांक 4 (जन्म तारीख 4,13,22,31 ): गुंतवणुकीकडे अधिक लक्ष द्या
कार्यक्षेत्रात इतर लोक तुमच्यावर वरचढ व्हायचा प्रयत्न करतील. आर्थिक बाबतीतही खर्चाची स्थिती बनत आहे, त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम हळूहळू वाढत जाईल. आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात हातातील काम पूर्ण होण्यात वेळ लागत आहे, असे दिसेल.
मूलांक 5 (जन्म तारीख 5, 14, 23): कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग
कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग बनत आहेत, आणि परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील आणि धनलाभ होईल. प्रेमसंबंधात काही बाबततीत मन व्यथित होऊ शकते, आणि अस्वस्थता जाणवेल. आठवड्याच्या अखेरीस आळस जाणवेल, त्यामुळे कोणतेही कार्य पूर्ण होताना वेळ लागू शकतो.
मूलांक 6 (जन्म तारीख 6,15,24): भागीदारीतील कामांतून शुभ परिणाम
कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि कोर्टकचेरीच्या प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येतील. प्रेमसंबंधात तुमच्या प्रेमात हळूहळू सुधार होताना दिसेल. बहुआयामी दृष्टिकोन ठेवत परिस्थितीचे आकलन केले तर प्रेमजीवनात सुखद अनुभव राहतील. आर्थिक खर्च अधिक राहतील, तुम्हाला याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या अखेरीस भागीदारीत केलेल्या कामातून शुभ परिणाम समोर येतील. तुम्ही एखाद्या वैवाहिक समारंभात सहभागी होऊ शकता.
मूलांक 7 ( जन्म तारीख 7, 16 , 25 ) : सुखसमृद्धीचे शुभ योग
आर्थिक विषयात आठवडा शुभ आहे आणि धनलाभाची स्थिती निर्माण होईल. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधात एखादी बातमी मिळाल्याने तुमचे मन उदास होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित बदल होण्यात अजून वेळ लागेल. आठवड्याच्या अखेरीस जीवनात सुखसमृद्धीचे शुभ योग साकारतील.
मूलांक 8 ( जन्म तारीख 8, 17, 26 ): प्रवासातून यश
कार्यक्षेत्रात प्रगती होईल तसेच तुमची तत्काळ निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला शुभ फल मिळतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून पैशांची आवक होण्याचे योग बनतील. प्रेमसंबंधात नाते दृढ होईल, आणि हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने होत जाईल. आठवड्याच्या अखेरीस सुधसमृद्धीचे योग बनतील. तसेच या आठवड्यात केलेले प्रवास यशाचे मार्ग खुले करेल.
मूलांक 9 ( जन्म तारीख 9,18, 27) : मान, सन्मानात वृद्धी होईल
कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मानसन्मान वाढत जाईल. या आठवड्यात आर्थिक स्थितीत सुधार होईल. थोडे दानधर्म आणि पूर्णकार्यही करावेत, असे केल्याने आर्थिक स्थिती सुदृढ होईल. प्रेमसंबंधात सुख क्षण व्यतित कराल, तसेच जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे निश्चित कराल. आठवड्याच्या अखेरीस सुखसमृद्धीचे शुभ योग बनत जातील, आणि मान सन्मानात वृद्धी होईल.