Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देवासाठी प्रदक्षिणा घालताय….! प्रदक्षिणा नियम, मंत्र, कोणत्या देवासाठी किती प्रदक्षिणा घालाव्यात? जाणून घ्या

8

Parikrama Niyam: देवी-देवतांची परिक्रमा करणे अर्थात प्रदक्षिणा हा पूजेतील महत्त्वाचा भाग असतो. परिक्रमा करणे याचा अर्थ असा की देवतेच्या मंदिराच्या भोवतीने फेरी मारणे. पण फार कमी लोकांना हे माहिती असते की कोणत्या देवतेची परिक्रमा किती वेळा केली जाते, आणि परिक्रमा करताना कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे. चला तर जाणून घेऊ कोणत्या देवाच्या किती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Rules of Pradkshina :

एखादे मंदिर, देवी-देवता, नदी किंवा झाड यांची परिक्रमा करण्याची फार जुनी परंपरा आहे. ही प्राचीन परंपरा हिंदू धर्मात फार महत्त्वाची मानली जाते. मान्यता अशी आहे की देवाच्या आजूबाजूची ऊर्जा ग्रहण करण्यासाठी ही प्रदक्षिणा केली जाते. हिंदू धर्मात बऱ्याच देवीदेवता आहेत, आणि प्रत्येक देवतेची प्रदक्षिणा करण्याची संख्या शास्त्रांमध्ये वेगवेगळी सांगितलेली आहे. बऱ्याच लोकांना याची माहिती नसते की कोणत्या देवतेच्या किती प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. चला तर जाणून घेऊ कोणत्या देवाच्या किती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत.

शिवलिंग : शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा केली जाता नाही. शिवलिंगाची अर्ध परिक्रमा केली जाते. शिवलिंगाची परिक्रमा करताना अभिषेकची धार ओलांडू नयेत असे मानले जाते.

भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार : भगवान विष्णूला पाच वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. त्यामुळे तुमच्या अतृप्त इच्छा पूर्ण होतात.

भगवान हनुमान – भगवाना हनुमान यांच्या तीन परिक्रमा केल्या जातात.

दूर्गा (सर्व देवी) – देवीसाठी एक परिक्रमा केली जाते.

सूर्यदेव – सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घातल्या तर अक्षय पुण्य प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.

गणपती – गणपतीला तीन प्रदक्षिणा घातल्या पाहिजे म्हणजे त्याची कृपा राहते आणि कार्य सिद्धी होते.

पिंपळाचे झाड – पिंपळाच्या झाड्याच्या १०८ परिक्रमा केल्याने चांगले फळ मिळते.

श्रीराम किंवा श्रीराम दरबार – चार परिक्रमा

श्रीकृष्ण किंवा राधाकृष्ण – चार परिक्रमा

शनिदेव – सात परिक्रमा

1. प्रदक्षिणा घालण्याचे नियम

शास्त्रांमध्ये बऱ्याच देवदेवतांना नक्की किती प्रदक्षिणा घालाव्यात याचा उल्लेख नाही, अशा देवदेवतांसाठी तुम्ही ३ प्रदक्षिणा करू शकता. प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली की ती पूर्ण करावी. अर्धवट प्रदक्षिणा घालू नये असे शास्त्रात सांगितले जाते. प्रदक्षिणा घालताना मन एकाग्र असावे, कोणाशी बोलू नये.

2. प्रदक्षिणा घालताना कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे?

प्रदक्षिणा घालताना ज्या देवासाठी प्रदक्षिणा घालत आहात, त्यांचे ध्यान केले पाहिजे आणि खालील मंत्राचा जप केला पाहिजे.

“यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च।
तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।

या मंत्राचा अर्थ असा आहे की जीवनात चुकून घडलेले आणि पूर्वजन्मातील सर्व पाप आणि चुकीचे कर्म परिक्रमासोबत संपून जावेत. हे परमेश्वरा मला सद्बुद्धी प्रदान कर.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.