Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amravati : हातावर लिहिलं सॉरी आई बाबा! दुधाची पिशवी आण्यासाठी गेली अन्…; घटना पाहून कुटुंब हादरले

13

अमरावती, जयंत सोनोने : एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने तापडीया मॉलच्या पाठीमागील सातुर्णा परिसरातील ११ मजली इमारतीवरून उडी टाकून आयुष्य कायमचे संपवून घेतले आहे.धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.आहे. सदर घटनेचा पोलीसांनी तपास सुरु केला आहे. पोलीसांना तिच्या घरातून उडी मारण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. पोलीसांनी संबंधित चिठ्ठी जप्त केली आहे, केवळ पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने आपण संपवत असल्याचे अल्पवयीन मुलीने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

अल्पवयीन मुलगी साई नगर परिसरातील चंदननगर इथली रहिवासी आहे. दूध पाकीट आणण्याचं निमित्त करुन अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली होती. ती थेट जवळील एका ११ मजली इमारतीमध्ये शिरली. तिथे तिने दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली आणि थेट इमारतीच्या छतावर पोहोचली. यानंतर क्षणाचा विलंब न करता अल्पवयीन मुलीने इमारतीवरुन उडी मारुन मृत्यूला कवटाळले. हा गंभीर प्रकार घडलेल्या घटनास्थळी पोलीसांना मोबाईल सापडला. मोबाइल ट्रेस करुन पोलीसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.
Thane News: पाठलागानंतर रिक्षात बसवून ॲसिड हल्ल्याची धमकी, विद्यार्थिनीसोबत एकतर्फी प्रेमविराचं धक्कादायक कृत्य

राजापेठ पोलिसांनी आज अल्पवयीन मुलीच्या घराची पोलीसांनी झाडाझडती घेतली. त्यावेळी उडी मारण्यापूर्वीची सदर चिठ्ठी लिहलेली सापडली.यामध्ये तिने आई वडिलांची माफी मागितली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार यापूर्वी तिचा प्रवेश एका मिलिटरी स्कूलमध्ये झाला होता. मात्र काही कारणास्तव तेथून अल्पवयीन मुलगी परत आली. त्यानंतर दर्यापूर येथील एका महाविद्यालयात अल्पवयीन मुलीने प्रवेश घेतला. त्यामुळे शैक्षणिक आयुष्यातील अपयशामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तरी पोलीसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


सदर इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात असून आजूबाजूच्या नागरिकांचेही पोलीसांनी जबानी नोंदवून घेतला आहे, अशी माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. अल्पवयीन मुलीच्या अशा टोकाच्या पावलामुळे कुटुंब पुर्णपणे हादरुन गेले आहे. आपली हसतखेळत असणारी मुलगी इतके टोकाचे पाऊल उचलेल असे आईवडिलांना सुद्धा वाटले नव्हते. शैक्षणिक वर्षाचा दबाव घेवून तिने टोकाचे पाऊल उचले असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.