Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यावर घोंघावतंय नवं संकट; गडचिरोलीत सहा जणांचा मृत्यू, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण?

9

मुंबई : राज्यात साथीच्या आजारांमध्ये मलेरिया आजारांचा जोर हा इतर आजारांच्या तुलनेमध्ये वाढता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इतर आजारांच्या तुलनेमध्ये मलेरिया झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. मलेरियामुळे जानेवारी ते २१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये सहा जणांचा मृत्यूही झाला आहे. या कालावधीमध्ये डेंग्यूमुळे तीन जणांना जीव गमवावा लागला. ७,४४७ जणांना मलेरिया, तर ४,९६५ जणांना डेंग्यूची लागण झाली. चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांची संख्या १,०७५ इतकी आहे.

अशी आहे स्थिती

जानेवारी ते जुलै २०२३ या काळात मलेरियाची रुग्णसंख्या १६ हजार १५९ इतकी होती. त्या वर्षात मलेरियामुळे २९ जणांना प्राण गमवावे लागले होते. या वर्षात डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही मलेरियाच्या रुग्णांपेक्षा अधिक होती. २१ जुलै २०२३पर्यंत राज्यात ५९ जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला होता. सन २०२३मध्ये चिकुनगुनियाच्या १,७०२ रुग्णांची नोंद झाली. या आजारामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. २१ जुलै २०२४पर्यंत राज्यात १,०७५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमातंर्गत मिळालेल्या माहितीमधून दिसून येते.

सध्या अशी आहे स्थिती
पालिकाक्षेत्रनिहाय कीटकजन्य आजाराची स्थिती (जानेवारी ते १४ जुलै २०२४)
जिल्हा – मलेरिया रुग्ण- मृत्यू


गडचिरोली- ३४७९ – ६
चंद्रपूर -३२१ -०
मुंबई – २६०३- ०
पनवेल – १८८- ०

डेंग्यू
जिल्हा- डेंग्यूरुग्ण

मुंबई – ७८३- ०
रत्नागिरी – १७८- ०
पालघर – २६५ -०
रायगड- १९७
कल्याण- १३२ – ०
नाशिक – ५०७
World Tiger Day : व्याघ्रमृत्यूत महाराष्ट्र दुसरे; मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू, चिंताजनक आकडेवारी समोर
असे सुरू आहेत प्रतिबंधात्मक उपाय

– रुग्णाच्या घराजवळच्या परिसरामध्ये जलदताप सर्वेक्षण
– तापाच्या रुग्णांची तपासणी
– संसर्ग झालेल्या रुग्णांना निदानानुसार, तसेच लक्षणानुसार वैद्यकीय उपचार
– मलेरियासाठी ७५, तर डेंग्यू, चिकुनगुनियासाठी ५० केंद्रांची स्थापना
– डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन त्यात अळीनाशक, गप्पी मासे सोडण्यात येतात
– रायगड, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांतील १,१८० गावांमध्ये फवारणी
– रुग्ण असलेल्या परिसरात कीटकशास्त्रीय सर्वेक्षण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.