Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती, कल्याणमध्ये एकाएकी भलेमोठे होर्डिंग कोसळले, अनेक गाड्या कचाट्यात

14

कल्याण : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी कारवाई सुरु असताना आता कल्याणमध्येही होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेत ही घटना घडली आहे. यामध्ये अनेक गाड्या दबल्या गेल्या पण सुदैवाने जीवितहानी टळली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

कल्याणच्या सहजानंद परिसरात भरदिवसा रहदारीच्या वेळी एकाएकी हे भलेमोठे होर्डिंग कोसळले. ते कोसळताच रस्त्यावरील नागरिकांची आणि वाहनचालकांची एकच धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही वेळासाठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai News: लिफ्टमध्ये गेल्याने अनर्थ, दरवाजा लागल्याने चिमुकला अडकला, अन्…; मुंबईतील थरारक Video
ऐन रहदारीच्या वेळी होर्डिंग कोसळल्याने अनेक गाड्या खाली दबल्या गेल्या. परिणामी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे. सहजानंद हा परिसर वर्दळीचा येथे अनेक दुकाने असून एक रुग्णालय देखील आहे. त्यामुळे ऐन रहदारीच्या वेळी होर्डिंग कोसळल्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले आहेत तर मनसे कार्यकर्त्यांनी देखील महापालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे. सहजानंद चौकात ठिय्या देत मनसैनिक आंदोलन करत आहेत. जोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सर्व घटनांवर अधिकृत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत जागेवरुन हलणार नसल्याची भूमिका मनसैनिकांनी घेतली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.