Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरी कोणी नसताना आयुष्याची दोर कापली, १३ वर्षीय मुलाने आयुष्य संपवलं; चिठ्ठीत लिहिलं

9

ठाणे : ठाण्यातील कल्याणमध्ये एका १३ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश पात्रा असे या मुलाचे नाव आहे. विघ्नेश आपले वडील प्रमोद कुमार, आई आणि बहिणीसोबत कल्याण पूर्वेकडील शिवाजीनगर चिकणीपाडा परिसरातील राहत होता.कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीत तो शिक्षण घेत होता. त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्याची आई आणि बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्या वेळेला त्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये एका मुलाने आणि शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
अंत:करणातून इच्छा आहे, उद्धव ठाकरेंनी पुन्हा CM बनावे! राष्ट्रवादीच्या खासदाराने घेतले चॅलेज

उल्हासनगरमध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या टोळीकडून ७५ किलो गांजा आणि ४८ हजार कोडिन बॉटल अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे या टोळीतील तस्करांनी कुरियरद्वारे अमली पदार्थ मागवले होते.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर मधील एका कुरिअरच्या कार्यालयाबाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कुरियरद्वारे मागवलेले अमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती आला. तो पार्सल घेण्यासाठी आला आणि त्याने पार्सल हातात घेतलं. त्या व्यक्तीने ते पार्सल हातात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याने चौकशीत टोळीतील इतरांची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनंतर इतर पाच जणांना भिवंडीतील एका चौकामध्ये कारमध्ये बसलेले असताना त्यांच्या मुसक्या आवळत पकडले आहे. त्यांच्याजवळ १ लाख १८ हजार ८८० रुपये रोख रक्कम आढळली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.