Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ठाकरेंच्या शिवसैनिकाची अनैतिक संबंधातून हत्या, बॉयफ्रेण्डच्या मदतीने पत्नीनेच काटा काढला

24

रायगड : पनवेल येथील खांदा कॉलनी येथे शिवसैनिक विष्णू गवळी यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना खांदा कॉलनीत उघडकीस आली आहे. खांदा कॉलनी येथे राहणारे विष्णू गवळी यांची पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक घटना ९ ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथे घडली. या प्रकरणी पत्नी अश्विनी विष्णू गवळी (वय ३७) आणि समीर मोहन ठाकरे (वय २६ रा. नेरे) यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.विष्णू बाबाजी गवळी यांची पत्नी अश्विनी आणि चालक समीर ठाकरे यांच्यात अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांवरून विष्णू गवळी यांनी केलेल्या विरोधाच्या कारणावरून आणि विष्णू गवळी यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःला मिळावी या कारणावरून पत्नी अश्विनी गवळी हिने समीर मोहन ठाकरे याच्याशी संगनमत करून विष्णू गवळी यांना राहत्या घरात गळा दाबून ठार मारले. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात ११ ऑगस्ट रोजी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यातील आरोपी अश्विनी गवळी हिला अटक केली असल्याची माहिती दिली. विष्णू गवळी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.