Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, तर समृद्धी महामार्ग दिल्लीशी जोडला जाणार

10

१. भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर ते देशाला संबोधित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलेच भाषण आहे. तर सलग ११ व्यांदा ते देशाला संबोधित करत आहेत. विशेष म्हणजे सकाळी साडेसात वाजता वरुणराजानेही लाल किल्ल्यावर उपस्थित लावत देशाला अभिवादन केले. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. आज देशात ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. मोदी म्हणाले की, आम्ही ४० कोटी असताना ब्रिटिशांना देशातून धुडकावून लावलं होतं. आज आपण १४० कोटी आहोत. १४० कोटी जनतेने ठरवलं तर देशाला समृद्ध होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

३. भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची मात्र शुभेच्छा देताना गफलत झाली. अजितदादांनी चुकून ‘प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा’ असं म्हटलं. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी सावरलं आणि हसत ‘स्वातंत्र्य दिन’ असं म्हणून स्वतःची चूक स्वतःच सुधारली.

४. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं वृत्त आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी महिन्यात रस्ते बांधणीसाठी बजेटमध्ये ८ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ही घटना घडली. अधिक बातमी वाचा सविस्तर…

५. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राज्यसभेच्या अंकगणितामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधी नेतेपदावरही संकटाचे ढग दाटले आहेत. वरिष्ठ सभागृहातील काँग्रेसची सध्याची सदस्य संख्या या पदासाठी आवश्यक त्या संख्याबळाच्या अगदी काठावर पोहोचली आहे. आगामी काळात त्यात बेरीज झाली नाही तर खर्गे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी राज्यसभेत आल्याने येथे पक्षाचा उत्साह वाढला असला तरी आगामी काळात विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शंका पक्षाला भेडसावत आहे.

६. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग पुढील वर्षीपासून थेट राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे. बांधकामाधीन वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेसह हा महामार्ग जोडला जाणार आहे. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही राज्यासह मुंबईतील नागरिकांसाठी आनंदाची बाब ठरत आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…

७. कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांची तीन पथके नेमण्यात आली आहेत. हे अधिकारी बुधवारी सकाळी कोलकात्यात दाखल झाले व लगेचच त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला.

८. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास बुधवारपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

९. विनेश फोगटला आता रौप्यपदक मिळू शकत नाही, असा निकाल क्रीडा लवादाने दिला आहे. या निर्णयावर आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेटे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

१०. चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील शो मधून घराघरात लोकप्रिय झालेले विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांचा आज वाढदिवस. भारत यांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले. आता त्यांचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. आपली मायबोली वराडी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवण्यासाठी त्यांनी अभिनयात सुद्धा ती वापरली. त्यामुळे या भाषेची गोडी सुद्धा प्रेक्षकांना लागल्याचे पाहायला मिळाले. भारत आज त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.