Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आई आणि मुलांचं प्रेम हे जगावेगळं असते. जन्माच्या आधीपासून आळशी जुळलेली नाळ म्हणजे आपल्या मुलाला काय होत आहे हे न सांगता आईला कळत असत. असेच एक कुलकर्णी कुटुंब कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात राहत होत. मे 2024 मध्ये आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचा निधन झाले होते. यानंतर एकटे पडलेले भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. अनेक जणांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही बहिण भाऊ आईच्या आठवणीतून बाहेर पडत नव्हते.
दोघेही उच्चशिक्षित असून अविवाहित होते. अखेर विरह सहन न झाल्याने या दोन्ही सख्या बहिण भावानी राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केला. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले असून आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवण्यात आले आहे. या आत्महत्येची नोंद राजारामपुरी पोलिसांत करण्यात आलीय.
आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे असा टोकाचा निर्णय घेतली अशी शक्यता कोणालाच वाटली नव्हती. आईचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना धीर दिला होता. मात्र आई जाण्याच्या विहरातून हे दोघेही बाहेर पडले नाहीत. उच्चशिक्षित असेलल्या भूषण आणि भाग्यश्री यांच्या या टोकाच्या निर्णयाबद्दल संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी