Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्वासनलिकेत अडकली सिमकार्ड काढण्याची पिन, शस्त्रक्रियेला यश, वैद्यकीय अधिकारी म्हणाले…

8

रत्नागिरी : कोकणात चिपळूण तालुक्यातील डेरवण हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पोटात गेलेली दातांची कवळी काढण्याची शस्त्रक्रिया यापूर्वी करण्यात आली आहे. त्याबरोबर आता मोबाईलचं सिमकार्ड काढण्याची पीन चक्क एका महिलेच्या घशात गेली ही पिन काढण्याची अवघड शस्त्रक्रिया डेरवण हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी केली आहे. विशेष म्हणजे हे ऑपरेशन टाकेरहित ऑपरेशन म्हणजेच ब्रोन्कोस्कोपी करून करण्यात आलं आहे.कान, नाक, घसा तज्ञांनी यासाठी आपलं कौशल्य पणाला लावत श्वास नलिकेत अडकलेले सिमकार्ड काढण्याची पिन घशातून बाहेर काढली आहे. रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने आपल्या मोबाईलचे सिम बदलतांना सिमकार्ड काढण्याची पिन तोंडात ठेवलेली. तेव्हा ती पिन चूकून त्या महिलेने गिळली. त्यावेळेस तिला श्वासोश्वासाला किंवा गिळायला काही त्रास होत नव्हता म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉ. रविंद्र गोंधळेकर यांना दाखवले तेव्हा त्यांनी अन्ननलिकेची स्कोपी केली पण त्यांना ती पिन दिसली नाही. नंतर त्यांनी छातीचा एक्स- रे आणि सिटीस्कॅन केला त्यामध्ये त्यांना ती उजव्या बाजूच्या श्वास नलिकेत दिसली.
Badlapur Case: दादा वॉशरुमला नेतो, गुदूगुदू करतो, चिमुकलीची माहिती; पोलिसांनी १५ तास बसवून ठेवलं, पालकांची चिड आणणारी माहिती

डॉ. गोंधळेकर यांनी लगेच पेशंटला वालावलकर हॉस्पिटला जाण्यास सांगितले. वालावलकर हॉस्पिटलमधे येताच पेशंटला रुग्णालयाचे ई. एन. टी सर्जन डॉ. राजीव केणी यांनी तातडीक सेवा विभागात तपासले आणि नातेवाइकांना इमर्जन्सी ऑपरेशन करून पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पीटलच्या तज्ञांवर विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी यांनी ऑपरेशनला लागणाऱ्या पूर्वतपासण्या आणि ऑपरेशनची तयारी लगेच करून घेतली. रात्री सुमारे १० वाजता पेशंटला ऑपरेशनला घेण्यात आले आणि डॉ.राजीव केणी यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफुसाच्या श्वासनलिकेतील पिन बाहेर काढली. अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्यामुळे पेशंट च्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया अवघड यांचं कारणासाठी आहे. यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका असतो. तसेच भूल देणे खूप कठीण असते. या शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे अत्यंत अवघड असे काम डॉ. लीना ठाकूर, डॉ. गौरव बाविस्कर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे पार पडले. रुग्णांचा वालावलकर हॉस्पीटलच्या डॉ. राजीव, डॉ. प्रतीक आणि डॉ. सीजा या कान, नाक, घसा तज्ञांवर वाढलेला विश्वास हीच त्यांच्या यशस्वीतेची पोचपावती आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.