Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बदलापूर मुलींवर अत्याचार प्रकरण; CCTV बाबत मोठी अपडेट, कॅमेरा बंदचा उलगडा!

7

ठाणे (बदलापूर) : बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फटकारलं होतं. लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहता का, अशा शब्दात सरकारला फटकारलं. याचदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.अत्याचार घडलेल्या शाळेत घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी चौकशी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मेंटेनन्सचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्याची मुदत महिन्याभरापूर्वीच संपली होती. त्यामुळे जबाबदारी आता शाळा प्रशासनावरच आली आहे. सीसीटीव्हीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर त्याला किंवा इतर ठेकेदाराला ते काम देण्यात आले नव्हते. महिन्याभरापासून सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सचे काम बंद राहिल्यामुळे काही कॅमेरे बंद पडले होते.
Badlapur Case: सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखम; बदलापूरमधील शाळा मुख्याध्यापिकेचा धक्कादायक दावा

बंद पडलेले कॅमेरे वेळेत दुरुस्त करण्यासाठी ठेकेदारच नसल्यामुळे शाळेतील सीसीटीव्हीची व्यवस्था कोलमडली होती. शाळा प्रशासनाने ठेकेदाराची मुदत संपण्याआधीच निविदा काढणे अपेक्षित होते किंवा नवीन ठेकेदाराची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र, ते काम न केल्यामुळेच गोंधळ झाला आणि आरोपीच्या विरोधात पुरावे मिळणे अवघड झाले.

सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखम

१३ ऑगस्ट रोजी मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिची मेडिकल टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट २४ तासांनी १४ ऑगस्ट रोजी आला. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं. हे समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी मुलीचे रिपोर्ट घेऊन थेट शाळा गाठली. त्यांनी शाळेतील वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका यांना त्यांच्या मुलीवर शाळेतील कोणतरी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट त्यांनी शाळेला दिला. यावर शाळेकडून आमच्या शाळेत असं होऊ शकत नाही, हे खोटं आहे. मुलगी सायकलवरुन पडली असेल किंवा सायकलमुळे जखम झाली असेल, असं म्हणत त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत त्यांना शाळेतून बाहेर जाण्यास सांगितलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.