Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Baramati Accident : टेम्पो आणि सायकलचा विचित्र अपघात, तरुणाच्या डोक्यावरुन गेले चाक

7

Tempo and Cycle Accident : बारामतीत आयशर टेम्पो आणि सायकलची जोरदार धडक झाली, अपघाताची तीव्रता इतका भीषण होता की १६ वर्षीय तरुणाचा घटनेत जागीच मृत्यू झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
टेम्पो आणि सायकलचा भीषण अपघात अपघातात मुलाचा मृत्यू झाला
बारामती, दीपक पडकर : नीरा- मोरगाव मार्गावर धोकादायक ठरलेल्या निरा डाव्या कालव्याच्या पुलाजवळ आयशर टेम्पो ( क्र. एमएच १२ एफझेड ३३१९) आणि सायकल स्वार यांच्यात झालेल्या धडकेत निंबुत – पोकळेवस्ती तालुका बारामती येथील तरुण इजाज खुर्शीद सय्यद वयवर्ष १६ तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक आणि सायकलच्या झालेल्या धडकेनंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुळूंचे नजीक त्याला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे एक चाक या तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला होता. संतप्त जमावाने हा ट्रक रस्त्यावरच पेटवून दिला.

घटना समजतात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अमरदीप भागवत भोकरे लातूरस्थित ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. नीरा -मोरगाव या राज्य मार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येथील याठिकाणी गतीरोधक बसवून नवीन पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास करंजेपूल पोलीस चौकीचे कर्मचारी करत आहेत.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.