Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुहागर विधानसभेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी तुमची साथ हवी, भाजपाच्या माजी आमदाराची कार्यकर्त्यांना साद

5

Guhagar Assembly Constituency : गुहागरमधून भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी उमेदवारीचे संकेत दिले असून तुमची साथ हवी असल्याची साद त्यांनी घातली आहे. अनेकांच्या ते गाठीभेटी घेत असून ते मतदारसंघातही सक्रिय झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनय नातू यांनी पुन्हा एकदा गेले काही दिवस सक्रिय होत मुंबई आणि गुहागरमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी बैठका सुरू केल्या आहेत. गेल्या दहा-बारा वर्षात आपला गुहागर मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून मागे राहिलेला दिसत आहे, माझ्यावर टीका करणारे स्वतः नौटंकी बाज आहेत, असा निशाणा त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यावर साधला आहे.

विनय नातू यांचे गुहागरमधून उमेदवारीचे स्पष्ट संकेत

यापुढे गुहागर मतदारसंघाचं गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे अशी ही हाक माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मतदारांची मुंबई दादर येथे घेतलेल्या सभेत साद घातली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याविषयी विधानसभा निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव विरुद्ध भाजपाचे विनय नातू अशी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असून नातू यांनी गुहागरमधून आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मात्र विनय नातू यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव की जाधव यांचे सुपुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण भास्कर जाधव चिपळूणसाठी आग्रही आहेत, तर मला पक्षाने संधी दिल्यास उदय सामंत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही उभं राहीन असेही ठाकरे गटाचे नेते विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी यापूर्वी अनेकदा म्हटलं आहे.
Dhiraj Deshmukh : लाडक्या बहिणींना लाभ मिळवून देणाऱ्या अंगणवाडीताईंना मानधन कधी मिळणार? आमदार धिरज देशमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

विनय नातू मतदारसंघात सक्रीय

गुहागर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर विनय नातू काही वर्षे शांत होते. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नातूंना सक्रिय होण्यासाठी सांगत असतानाच नातूंनी मात्र काहीशी शांत राहण्याची भूमिका घेतली होती. पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून नातू पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. नातू यांनी गेले काही महिने विकास कामावर लक्ष केंद्रित करत गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गाव भागात भेटीगाठी बैठका दौरे जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्याची मोहीमच हाती घेतली आहे. यापुढे गुहागर मतदारसंघाला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून मी नेहमी प्रयत्नशील राहीन असं सांगत गुहागर विधानसभा मतदारसंघातील आपल्या महायुतीकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत नातू यांनी दिले आहेत.

पदावर नसतानाही केली विकास कामं

दादर – मुंबई येथे गुहागर मतदार संघातील मुंबईस्थित पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. मतदारसंघाचं गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. ग्रामीण भागातील विविध प्रश्न विकासाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही नातू यांनी यावेळी दिली आहे. गुहागर मतदारसंघातील गुहागर शहर, लोटे, धामणदेवी, दोणवली या जिल्हा परिषद गटातील सुमारे २५० ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते‌. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून या सत्तेचा गुहागर मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज संरक्षक भिंती, ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यात जाणाऱ्या पाखाड्या या बनवण्यासाठी नातू यांनी पदावर नसताना देखील प्रयत्न करून ही विकास कामे मार्गी लावली यासाठी त्यांचा उपस्थित ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायाला फाटा, तरुणीने सुरू केली ऑर्गेनिक शेती; वर्षाला २५ लाखांची कमाई
२००९ मध्ये झालेल्या मतदार संघाच्या पुनर्रचनेत खेड विधानसभा मतदारसंघ रद्द झाला. त्यामुळे पारंपारिक घेतलेल्या भाजपाचा गुहागर मतदारसंघ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं वजन वापरून भाजपाचे तत्कालीन नेते माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे थेट रामदास कदम या आपल्या शिलेदारासाठी शब्द टाकून मागून घेतला होता आणि त्या बदल्यात मुंबई येथील एक मतदारसंघ भाजपला देण्यात आला होता.

Vinay Natu : गुहागर विधानसभेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी तुमची साथ हवी, भाजपाच्या माजी आमदाराची कार्यकर्त्यांना साद

पक्षादेश डावलून बंड, अपक्ष निवडणूक लढवली

मात्र २००९ साली भास्कर जाधव यांच्यासमोर रामदास कदम यांच्या झालेल्या पराभवानंतर भाजपाचा हा पारंपरिक असलेला बालेकिल्ला तेव्हापासून आमदार भास्कर जाधव यांच्या ताब्यात गेला आहे. त्यावेळेला नातू यांनीही पक्षादेश डावलून बंड करत विनय सेनेची स्थापना करत अपक्ष उमेदवारी लढवली होती, मात्र जाधव यांच्यासमोर त्यांचाही पराभव झाला होता. तेव्हापासून नातू काहीसे शांत होते. आता पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना भाजपाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. रामदास कदम आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फटका नातू यांना बसू शकतो, तसाच या वादाचा फटका दापोली येथील रामदास कदम यांचे सुपुत्र विद्यमान आमदार योगेश कदम यांनाही बसू शकतो. त्यामुळे या वादावरही शिवसेना भाजपाचे पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.