Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jalgaon Man Ends Life At Home: पती म्हणाला की मला चिप्स खायचे आहेत तळून दे. ती किचनमध्ये गेली आणि इकडे त्याने गळफास घेतला. जळगावातील घटनेने खळबळ
लग्नाच्या तीन महिन्यातच पतीने केली आयुष्याची अखेर
यावल तालुक्यातील थोरगव्हाण या गावातील रहिवासी स्वप्निल देविदास चौधरी (वय ३०) या विवाहित तरूणाने शनिवारी आपल्या घरात गळफास घेत घेतला जगाचा निरोप घेतला. स्वप्नील चौधरी याचे तीन महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. सर्व काही चांगले सुरु होता. त्यांचा सुखी संसार सुरू होता. लग्नानंतर तीन महिन्याच्या काळात पती-पत्नीमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. मात्र, स्वप्नीलने असा धक्कादायक निर्णय घेतल्याने पत्नीला मोठा धक्का बसला आहे.
Raigad Crime: माझं तुझ्यावर प्रेम, लांब फिरायला येशील का? शेजाऱ्याकडून विनयभंग, तरुणीने हाताची नस कापली अन्…
मला चिप्स खायचे आहेत, तळून दे… चिप्स घेऊन येताच पत्नीने हंबरडा फोडला
स्वप्नील चौधरी याने ३१ ऑगस्ट शनिवारी पत्नी पुनम स्वप्नील चौधरीला सांगितले की, तू माझ्यासाठी चिप्स तळून दे, मला चिप्स खायचे आहे. पतीने असं सांगितल्याने त्याची पत्नी किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाऊन पत्नी चिप्स तळत होती आणि दुसरीकडे स्वप्नील राहत्या घरात आपल्या आयुष्याची अखेर करत होता. स्वप्नीलने खोलीत जाऊन छताच्या सहाय्याने साडीने गळफास घेतला.
चिप्स द्यायला खोलीत गेली अन् पतीला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहिलं
जेव्हा चिप्स तळून झाल्यानंतर पत्नी पती स्वप्नीलला चिप्स देण्यासाठी खोलीत गेली. तेव्हा तिने पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. पतीला या अवस्थेत पाहताच पत्नीने एकच आक्रोश केला.
Jalgaon News: माझ्यासाठी चिप्स बनव, ती किचनमध्ये अन् त्याने आयुष्य संपवलं, पत्नीचा काळीज चिरणारा आक्रोश
पत्नीने मोठा आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांनी धाव घेतली. तात्काळ स्वप्नील याला खाली उतरवलं आणि त्याला यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी स्वप्नील पाटील यांची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मयत झाल्याचे वृत्त कळताच कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला.