Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापुरात ट्रिपल धमाका, आधी घाटगेंनी भाजप सोडला, आता दोन बडे नेते घड्याळ काढण्याच्या तयारीत

9

SamarjeetSinh Ghatge joins Sharad Pawar NCP : समरजीतसिंह घाटगेंनी भाजपला रामराम ठोकून ‘तुतारी’ हाती घेतली असतानाच महायुतीतील दुसऱ्या घटकपक्षालाही त्याच दिवशी डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.

Kolhapur Politics : कोल्हापुरात ट्रिपल धमाका, घाटगेंनी भाजप सोडला, तर दोन बडे नेतेही ‘घड्याळ’ काढण्याच्या तयारीत

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दादा गटातील दोन बडे नेते एकाच वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेही शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यामुळे ‘घड्याळ’ सोडून दोन्ही पाटील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची ‘तुतारी’ फुंकण्याची शक्यता आहे. आज भाजप नेते समरजीतसिंह घाटगे पक्षाला रामराम ठोकून ‘तुतारी’ हाती घेणार असतानाच महायुतीतील दुसऱ्या घटकपक्षालाही त्याच दिवशी डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. माजी आमदार के. पी. पाटील आज पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सकाळीच पोहचले. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी ते पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, समर्थक भाजप सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत

कोण आहेत के. पी. पाटील?

के. पी. पाटील हे कोल्हापुरातील राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट मिळणं निश्चित मानलं जात आहे. आता महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने के. पी. पाटलांनी महाविकास आघाडीचा पर्याय धुंडाळला आहे.

पाटलांनी मविआतील सर्वच पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. राधानगरी मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सुटण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता के. पी. पाटील ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवणार का, याची उत्सुकता आहे.
हायकमांडचा होकार, काँग्रेसकडून विधानसभेचे ६ उमेदवार जाहीर, पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढतही ठरली

ए वाय पाटीलही भेटीला

दुसरीकडे, ए वाय पाटीलही शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. विशेष म्हणजे के. पी. पाटील आणि ए वाय पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यांनाही राधानगरीतूनच तिकीट हवं आहे. त्यामुळे एकाच वेळी हे दोन्ही राजकीय वैरी महायुतीला रामराम ठोकून मविआत प्रवेश करतात का, त्यानंतर एकाच मतदारसंघावरुन काय खटके उडतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.