Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महामुंबईत प्रवास होणार वेगवान; साडेबारा हजार कोटींचे रस्ते, पूल MMRDAकडून मंजूर

7

MahaMumbai News: महामुंबईत सातत्याने वाढणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि संलग्नता सुधारण्यासाठी प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चेअंती विविध प्रकल्पांना मंजुरी दिली.

हायलाइट्स:

  • ५६ किमीच्या नऊ प्रकल्पांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती
  • वाहतूककोंडी टळणार; प्रवास सुखकर होणार
  • प्रकल्पांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचा विश्वास
महाराष्ट्र टाइम्स
Road construction AI2
मुंबई : महामुंबईत रस्ते आणि पुलांचे जाळे भक्कम होणार आहे. साडेबारा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ५६ किमीचे रस्ते, पूल, पादचारी मार्ग तयार करण्यासाठी नऊ प्रकल्पांच्या कंत्राटदारांच्या नियुक्तीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मंजुरी दिली आहे. प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या २८२ व्या बैठकीत या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला.महामुंबईत सातत्याने वाढणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि संलग्नता सुधारण्यासाठी प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चेअंती विविध प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख रस्ते, सागरी किनारा मार्ग, खाडीवरील पूल, मेट्रोजवळील पादचारी पूल आदी विकासकामांचा समावेश आहे. यामध्ये एकूण ५६.१९७ किमी लांबीचे रस्ते एकूण १२ हजार ५४६.१४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहेत.

हे प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील संलग्नता सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असून, यामुळे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हे पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई आणि ठाण्यातील वाहतुकीची स्थिती सुधारण्यात आणि विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. भविष्यातील गरजा पूर्ण करणारे रस्त्यांचे जाळे तयार करण्यावर लक्ष केंद्रित असेल, असे ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

या प्रकल्पांना मंजुरी
१. बाळकूम ते गायमुख ठाणे सागरी किनारा मार्ग (कळवा खाडी पुलासह)
लांबी : १३.४५ किमी
कंत्राटदार : मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड
खर्च : २,७२७ कोटी रु.

२. कासारवडवली ते खारबाव, भिवंडीदरम्यान खाडीपूल

लांबी : ३.९३ किमी
कंत्राटदार : मे. अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
खर्च : १,५२५.३१ कोटी रु.
पुणेकरांनो कृपया लक्ष द्या! गणेशोत्सवानिमित्त PMPच्या बस मार्गांत मोठे बदल, कसे असतील पर्यायी मार्ग?
३. छेडानगर-ठाणे उन्नत पूल (पूर्व मुक्त मार्ग विस्तार)

लांबी : १२.९५५ किमी
कंत्राटदार : मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड
खर्च : २,६८२ कोटी रु.

४. पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंद नगर-साकेत उन्नत रस्ता

लांबी : ८.२४ किमी
कंत्राटदार : मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड
प्रकल्प खर्च : १,८४७.७२ कोटी रु.

५. राष्ट्रीय महामार्ग-४ (जुना)-काटई नाका उन्नत रस्ता :

लांबी : ६.७१ किमी
कंत्राटदार : मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
प्रकल्प खर्च : १,९८१.१७ कोटी रु.

६. गायमुख ते पायेगाव खाडीपूल

लांबी : ६.५०९ किमी
कंत्राटदार : मे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड
खर्च : ९७५.५८ कोटी रू.
छत्रपती संभाजीनगर-पुणे सुसाट; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, ‘उन्नत’साठी साडेसात हजार कोटींचा खर्च
७. कोलशेत-काल्हेर खाडी पूल
लांबी : १.६४ किमी
कंत्राटदार : मे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड
खर्च : २८८.१८ कोटी रु.

८. कल्याण-मुरबाड रोड-बदलापूर रोड उन्नत रस्ता

लांबी : २.१६ किमी
कंत्राटदार : मे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड
खर्च : ४५१.१० कोटी रु.

९. मेट्रो मार्गिकेवजळ तीन हात नाका येथे पादचारी पूल
लांबी : ६०३ मीटर
कंत्राटदार : मे. केबीए इन्फ्रास्ट्रक्चर-मे. श्री मंगलम बिल्डकॉन
खर्च : ६८.०८ कोटी रु.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.