Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, टिंगरेंनी सांगितलं ‘अंतिम’ सत्य; दादांचं नाव घेत गौप्यस्फोट

6

विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये पुण्यामधील वडगाव शेरीच्या विद्यमान आमदारांचे नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच यावर बोलताना सुनील टिंगरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमधील सर्व पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमधील एकाही पक्षाने अद्याप आपली यादी जाहीर केलेली नाही. शिंदे गटाने मंगळवारी रात्री उशिरा आपली यादी जाहीर केली. तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ३८ उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे मतदारसंघ अदलाबदल करण्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. भाजप आणि दादा गटामध्ये खडकवासला आणि वडगाव शेरी जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याची चर्चा होती. अशातच यावर सुनील टिंगरे यांनी थेट अजित दादांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ही पहिली यादी आहे अंतिम नाही, मला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी फोन केलाय. मला अजित पवारांनी एबी फॉर्म दिलाय. मी निवडणूक लढणार आहे. माझी उमेदवारी फायनल असल्याचं मला सांगितलं आहे. मैत्रिपूर्ण लढत होणार असेल त्याबाबत अजितदादा निर्णय घेतील. माझ्यासमोर कोणता पक्ष आहे किंवा कोणता चिन्ह आहे पाहत नाही, कारण मी फक्त विकासकामावर निवडणूक लढतो, अशी प्रतिक्रिया देत सुनील टिंगरे देत वडगाव शेरी मदारसंघाचा सस्पेन्स संपवला आहे.
‘अमित ठाकरेंऐवजी मनसेचा कार्यकर्ता असता तर…’; सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया काय?
या मतदारसंघात आतापर्यंत मी जितका निधी आणलाय याआधी कोणत्याही आमदाराने तेवढा आणलेला नाही. जनतेला काम करणारा माणूस लागतो. १५१० कोटींचा निधी मी आणलेला असून त्यामध्ये अनेक मोठे उपक्रम केले आहेत. शरद पवारांनी माझ्यावर टीका केली. मात्र शरद पवार माझ्यासाठी आदरणीय त्यांना माझा कान पकडण्याचा अधिकार असल्याचंही सुनील टिंगरेंनी म्हटलं आहे.
शिंदेंना बंडात साथ, तरी तीन आमदार गॅसवर, सलग तीन टर्म निवडून आलेला दिग्गजही वेटिंगवर
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना उमेदवारी हवी आहे. मात्र महायुती असल्याने तिथे दादा गटातील सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. पार्शे कार अपघात प्ररकरणावेळी टिंगरे यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे या विधानसभेला टिंगरे यांचे तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.