Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Who Is Sana Malik : सना मलिक यांना अजित पवार गटाकडून अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं आहे. वडिलांच्या बालेकिल्ल्यातच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेल्या कोण आहेत सना मलिक?
कोण आहे सना मलिक?
२००९ पासून अनुशक्तीनगरचं प्रतिनिधित्व नवाब मलिक यांनी केलं आहे. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले होते. सना मलिक या नवाब मलिक यांची मुलगी आहेत. करोना काळात आपल्या कामामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
लॉरेन्स बिश्नोईची राजकारणात एन्ट्री? या पक्षाकडून महाराष्ट्रात विधानसभा लढण्याची ऑफर
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप
नवाब मलिक हे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रिमंडळाचे सदस्य होते. त्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये जेलमध्ये गेले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप त्यांच्यावर आहेत. मलिक जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लेकीने सना मलिक यांनी वडिलांच्या मतदारसंघात काम पाहिलं आणि विकास कामांसाठी पाऊल उचललं. नवाब मलिक हे शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. त्याशिवाय त्यांच्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचे आरोपही करण्यात आले होते.
Jitendra Awhad : गुरुप्रमाणे शिष्याचीही पावसात चिंब भिजत राजकीय फटकेबाजी, मुंब्र्यात भर पावसात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण
अणुशक्तीनगर नवाब मलिक यांचा बालेकिल्ला
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सना मलिक यांना राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली होती. त्या अणुशक्ती नगर विधानसभेत सतत सक्रिय आहेत. त्यांची या विधानसभा मतदारसंघात मोठी पकड आहे. अणुशक्तीनगरमधील विधानसभेची जागा नवाब मलिक यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांच्याच बालेकिल्ल्यात लेकीला उमेदवारी देण्यात आल्याने सना मलिक यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
वडील जेलमध्ये गेले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध? अणुशक्तीनगरमधून मिळाले तिकीट मिळालेल्या सना मलिक कोण?
सना मलिक यांचे पती कोण?
सना मलिक यांचं लग्न मोइनुद्दीन शेख यांच्याशी झालं आहे. दोघांना दोन मुलं आहे. सना मलिकचे पती मोइनुद्दीन शेख हे दादामियां इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतात. या कंपनीत सना शेखदेखील त्यांची पार्टनर आहे. सना मलिक यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये स्वत:ला होम मेकर, आर्किटेक्ट, वकील, उद्योगपती, बिजनेस वूमन आणि सोशल वर्कर म्हटलं आहे. त्याशिवाय त्या रहबर फाऊंडेशन नावाने एक ट्रस्ट चालवतात, या ट्रस्टद्वारे गरीब-गरजूंना मदत केली जाते.