Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Eknath Shinde: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेला सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुडकावल्याचं दिसत आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीतून ही बाब स्पष्टपणे समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली. त्यावेळी राज्यात आचारसंहिता लागू झालेली नव्हती. राज्यात भाजपविरोधात वातावरण आहे. भाजपनं अधिक जागा लढवल्यास लोकसभेसारखा फटका बसेल. त्याचा परिणाम महायुतीच्या कामगिरीवर होईल. त्यामुळे महायुतीची सत्ता पुन्हा आणायची असल्यास शिवसेनेला १२० जागा लढवू द्या, अशी मागणी शिंदेंनी शहांकडे केली होती. त्यांनी १२० जागांची यादीही शहांना दिली होती.
Eknath Shinde: हे वागणं बरं नव्हं! शिंदेंनी फडणवीसांकडे व्यक्त केली नाराजी; कारण ठरली ‘ती’ उमेदवारी
या भेटीत शहांनी शिंदेंना तिकीट वाटप करताना नवे चेहरे देण्याचा सल्ला दिला. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांविरोधात नाराजी आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी द्या. अन्यथा त्या जागांवर पराभव पत्करावा लागेल. त्याचा परिणाम महायुतीच्या एकत्रित कामगिरीवर होईल, असं शहांनी शिंदेंना सांगितलं. शहांचा सल्ला शिंदेंना फारसा रुचलेला नाही, असं त्यावेळी सेनेतील वरिष्ठ नेत्यानं सांगितलेलं होतं.
Amit Thackeray: अमित ठाकरेंना ‘बाय’ नाही; जागावाटपाआधीच मातोश्रीकडून उमेदवार ठरला; माहीममध्ये तिरंगी सामना
शहांचा सल्ला ऐकून तिकीट कापल्यास विधानसभेच्या तोंडावर चुकीचा मेसेज जाईल. बंडात साथ देणाऱ्या आमदारांना शिंदेंनी वाऱ्यावर सोडलं, असा संदेश पसरेल. त्याचा फटका बसेल, अशी शक्यता होती. त्यामुळे शिंदेंनी थेट शहांचा सल्ला धुडकावला आणि विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. भाजपनंही पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं. आता शिंदेंनी थेट महाशक्तीच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे.
Eknath Shinde: शहांचा सल्ला धुडकावला, शिंदेंनी पहिल्याच यादीतून पॅटर्न दाखवला; लोकसभेमुळे आत्मविश्वास वाढला
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सांगण्यावरुन शिंदेंनी काही ठिकाणी उमेदवार बदलले. काहींची तिकिटं कापली. हिंगोलीत तर जाहीर केलेली उमेदवारी शिंदेंना मागे घ्यावी लागली. भाजपनं सर्व्हेंचा हवाला देत या गोष्टी केल्या. पण प्रत्यक्षात भाजपची कामगिरी सुमार झाली. तर शिंदेसेनेची कामगिरी भाजपपेक्षा उत्तम राहिली. त्यामुळे मित्रपक्षाच्या सर्व्हेंना किती किंमत द्यायची, असा प्रश्न शिंदेसेनेतील नेत्यांकडून विचारला जाऊ लागला. लोकसभेत शिंदेसेनेनं १५ जागा लढवत ७ जागांवर बाजी मारली. त्यामुळे शिंदेंचा आत्मविश्वास दुणावला आहे.