Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lawrence Bishnoi Got Offer Contest Vidhan Sabha : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. बिश्नोईला पत्र लिहून त्याला क्रांतीकारक असं संबोधत त्याने निवडणूक लढावी, असं सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभा लढण्याची ऑफर
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेना पक्षाकडून लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रात विधानसभा लढण्याची ऑफर दिली आहे. या पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला आहेत. त्यांनी याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला एक औपचारिक पत्र लिहिलं आहे. सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईची तुलना भारताचे क्रांतीकारक भगत सिंह यांच्याशी केली आहे.
विधानसभेसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरेंना या मतदारसंघातून उमेदवारी, कोणाकोणाला संधी?
बिश्नोईला क्रांतीकारी संबोधलं
सुनील शुक्ला यांनी पत्र लिहून लॉरेन्स बिश्नोईचं कौतुक करत त्याला क्रांतीकारी असं संबोधलं आहे. त्याशिवाय बिश्नोई जर राजकारणात आला, तर राजकारणात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. जर लॉरेन्स बिश्नोई त्यांच्या पक्षात आला, तर त्यांचा पक्ष बिश्नोईच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.
Jitendra Awhad : गुरुप्रमाणे शिष्याचीही पावसात चिंब भिजत राजकीय फटकेबाजी, मुंब्र्यात भर पावसात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण
पत्रात लिहिलंय की…
सुनील शुक्ला यांनी पत्रात लिहिलंय, की तुम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढावी असा आमचा प्रस्ताव आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तुमचा प्रचार करण्यासाठी तयार आहेत, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहात आहोत.
पत्रात पुढे असं लिहिलंय, की आम्हाला तुमचा अभिमान आहे, की तुम्ही पंजाबमध्ये जन्मलेले एक उत्तर भारतीय आहोत आणि तुम्ही अशा मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करता, जे आमच्या पक्षाच्या मूल्यांशी जुळतं. आमचा पक्ष तुम्हाला विजयी करण्यासाठी कोणतीही कमी ठेवणार नाही.
लॉरेन्स बिश्नोईची राजकारणात एन्ट्री? या पक्षाकडून महाराष्ट्रात विधानसभा लढण्याची ऑफर
काय आहे उत्तर भारतीय विकास सेना पक्ष?
उत्तर भारतीय विकास सेना पक्ष हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. या पक्षाद्वारे महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीय लोकांच्या अधिकारांच्या हक्कासाठी लढतो.