Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Katol Vidhan Sabha: देशमुखांमध्येच ट्विस्ट! अनिल की सलील? पिता-पुत्रावरुन काटोलचे कार्यकर्ते संभ्रमात
Katol Vidhan Sabha: काही युवा कार्यकर्त्यांनी अनिलबाबूंचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांचे नाव समोर केल्याने नेमके कोण उभे राहणार, असे संभ्रमाचे वातावरण सध्या तयार झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची पहिली यादी गुरुवारी आली. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावानंतर दुसऱ्या क्रमांकावर अनिल देशमुख आहेत. यानंतर अवघ्या दोन तासात राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या काटोल व थडीपवनी येथे दोन बैठका झाल्या. ‘बी फॉर्म माझ्या नावाने आलेला आहे. काय करायचे?’ असा सवाल यावेळी अनिल देशमुख यांनी विचारला. त्यावर कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काटोलमधील बैठकीत कार्यकत्यांनी सलील देशमुख यांचे नाव समोर केल्याचे समजते. २०१४ सालचा अपवाद वगळता काटोलमध्ये १९९५ पासून अनिल देशमुख यांचे एकछत्री राज्य आहे. पुतणे डॉ. आशिष देशमुख यांनी मोदी लाटेत अनिलबाबूंचा पराभव केला होता. महाआघाडीच्या काळात अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रिपद आले. मात्र, त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. त्यांच्यावर शंभर कोटी रुपये खंडणी वसुलीचा आरोप झाला. त्यांना १४ महिने कारागृहात रहावे लागले त्यांच्या निवासस्थानी शंभरहून अधिक छापे पडले. संपूर्ण कुटुंबीयांची चौकशी झाली.
गेल्यावर्षी ते सुटका होऊन बाहेर येताच राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचा राजकीय वाद चांगलाच रंगला. वडिल कारागृहात असताना सलील देशमुख यांनी मतदारसंघ सांभाळला. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. यातून मतदारसंघात त्यांचे नेटवर्क तयार झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. यावेळी अनिल देशमुख यांच्यासोबत सलील देशमुख देखील निवडणूक लढण्यास उत्सुक होते.
आव्हाड आदित्य ठाकरेंपेक्षाही श्रीमंत; ठाण्यातील उमेदवार कोट्यधीश, कोणाकडे किती संपत्ती?त्यांच्यासाठी दक्षिण-पश्चिम, मोर्शी आणि आर्वी मतदारसंघांची चाचपणी झाली. याउलट अनिल देशमुख यांचे नाव दक्षिण-पश्चिम नागपूरमधून चर्चेत आले होते. कुणाला संधी मिळते व कोण निवडणूक लढवणार, असा संभ्रम कार्यकत्यांना होता. अनिल देशमुख यांच्या घोषणेनंतर दोन तासातच सलील यांचे नाव समोर आल्याने काटोलचे नेमके उमेदवार कोण, असा प्रश्न कार्यकर्ते व मतदारांना पडला आहे. दरम्यान, हा तिढा लवकरच सुटेल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.