Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mahayuti Seat Sharing: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. पण सूत्र ठरलेलं नाही.
वर्सोवा, अंधेरी पूर्व, वरळी, वसई, मीरा भाईंदर, मानखुर्द, आष्टी, वरुड मोर्शी, निफाड, कराड उत्तर, फलटण या ११ जागांवरुन महायुतीत पेच आहे. मुंबईत बहुतांश जागांवर भाजप आणि शिवसेनेत पेच आहे. मानखुर्द शिवाजीनगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी द्यायची आहे. पण त्यांच्या संभाव्य उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांना मलिक यांच्यावर केला होता. त्यामुळे मलिक यांना उमेदवार देण्यास भाजपचा ठाम विरोध आहे. पण अजित पवारांनी त्यांच्या लेकीला अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिलेली आहे.
Ajit Pawar: ये दादा का स्टाईल है! भाजपचा विरोध झुगारला; शेवटी ‘तिकडे’ उमेदवार दिलाच, ‘लाडकी लेक’ रिंगणात
आष्टीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीवरुन आमनेसामने आहे. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबे आणि भाजपच्या सुरेश धस यांच्यात स्पर्धा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा मतदारसंघावर दावा आहे. आष्टीत विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा आहे. आजबेच या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. २०१९ मध्ये ते स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून विजयी होते. पण त्यांना तिकीट देण्यास भाजपचा विरोध आहे.
MVA Seat Sharing: परस्पर AB फॉर्म का वाटले? काँग्रेसचा ‘मातोश्री’ला सवाल; ५ ते ७ जागांवर सांगली पॅटर्न?
निफडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर आमदार आहेत. पण तिथे भाजपच्या यतीन कदम यांना तिकीट आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. कराड उत्तरची जागा भाजपला मनोज घोरपडे यांच्यासाठी हवी आहे. इथेही राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. शामराव पाटील कराड उत्तरमधून १९९९ पासून सलग निवडून येत आहेत.
Mahayuti Seat Sharing: जागा अकरा, दिल्लीला चकरा; महायुतीचं पुन्हा तेच; कोणकोणत्या जागांवर पेच? नेमकी कोणाची गोची?
राष्ट्रवादीकडे असलेली फलटणची जागाही भाजपला हवी आहे. भाजपचे रणजीत निंबाळकर फलटणच्या जागेसाठी आग्रही आहे. इथे दीपक चव्हाण आमदार आहेत. त्यांची उमेदवारी खुद्द अजित पवारांनी जाहीर केलेली होती. पण त्यांनी दादांची साथ सोडत तुतारी हाती घेतली. त्यामुळे दादांना धक्का बसला. आता या जागेसाठी भाजपचा दबाव वाढत आहे.