Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chandrapur Vidhan Sabha: राणी हिराईच्या चांद्यातून केवळ तीन महिला आमदार; आजवर ३२ महिलांनी लढविली विधानसभा
Chandrapur Vidhan Sabha: चंद्रपूर जिल्ह्यात केवळ तीन महिला आमदार झाल्याची नोंद आहे. या जिल्ह्यातून ३२ महिलांनी विधानसभा निवडणूक लढविली आहे. पण, मतदारांनी केवळ तीन महिलांना विधिमंडळात पाठविले.
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर सावली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोधरा बजाज या पहिल्यांदा आमदार झाल्या. चिमूर मतदारसंघातून त्यांनी दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला. भाजपच्या शोभाताई फडणवीस या सावली मतदारसंघातून विजयी होत मंत्री बनल्या. विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनाही आमदारपदाचा मान मिळाला. तर तारा महादेव काळे यांनी सर्वाधिक सहा वेळा निवडणूक लढविली आहे. यशोधरा बजाज यांनी केवळ आमदार नव्हे तर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर शोभाताई फडणवीस यांना कॅबिनेट मंत्रीपद भूषवता आले.
चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विजयी होत दिल्ली गाठणाऱ्या प्रतिभा धानोरकर या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी १९६४च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. यानंतर तब्बल ६० वर्षांनंतर धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार चंद्रपूरला मिळाली.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाने राजकीय सहभाग वाढला असला तरी आमदारकीसाठी महिलांना अजूनही संघर्ष करावा लागत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
चंद्रपूरच्या शिल्पकार राणी हिराई
बल्लारपूर व चंद्रपूर राजवटीत २३ गोंडवंशीय राजे होऊन गेले. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक होती. राणी हिराईचे माहेर मध्य प्रदेशातील मदनापूरचे. त्यांचे वडील सरदार होते. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच मिळाले. वीरशहा गादीवर बसला. राणी हिराईचा त्यांच्याशी विवाह झाला. वीरशहाने आपली कारकीर्द गाजवली. त्यांची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि राज्य कारभार बघू लागल्या.
मविआचा तिढा सुटेना; जागावाटपाबाबत नाना पटोलेंच्या पत्रामुळे वादाची नवी ठिणगी, पत्रात नेमकं काय?
राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला कल्याणकारी राज्य व्यवस्थेतून संस्कारीत केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. मात्र, त्याला निधड्या छातीने प्रतिकार केला. राणी स्वत: रणांगणावर उतरली. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. मात्र, राणीने राज्यात गोहत्याबंदी केली. अंचलेश्वर मंदिर, महाकाली देवीचे मंदिर बांधले. पतीचे स्वप्न खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा व हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविली. लोक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्याचा इतिहास आहे.