Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुहागरमधून राजेश बेंडल यांच्या नावावर शिक्कामोर्तब? माजी आमदार विनय नातू यांचा ग्रीन सिग्नल?

9

Guhagar Rajesh Bendal: विनय नातू यांची खास भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ठाण्यातील रवींद्र फाटक दोन दिवसांपूर्वी गुरुवारी गुहागर दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हायलाइट्स:

  • गुहागरमधून राजेश बेंडल यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
  • माजी आमदार विनय नातू यांचा ग्रीन सिग्नल?
  • गुहागरमध्ये काय होणार?
Lipi
गुहागर विधानसभा मतदारसंघ

प्रसाद रानडे, रत्नागिरी : महायुतीच्या कोकणातील जागा वाटपाबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे. या मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी गेले वर्षभर तयारी सुरू केली होती. अशातच गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची मागणी पालकमंत्री उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र नातू यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय ही उमेदवारी जाहीर करणे शिवसेनेलाही परवडणार नाही याची जाणीव असल्याने या जागेचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. गुहागर शहरविकास आघाडीचा केलेला प्रयोग गुहागर विधानसभेत डॉ. विनय नातू हे नगरपंचायत निवडणुकीत वापरलेला फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत वापरणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले ठाणे येथील रवींद्र फाटक आणि डॉ. विनय नातू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजेश बेंडल यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.विनय नातू यांची खास भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ठाण्यातील रवींद्र फाटक दोन दिवसांपूर्वी गुरुवारी गुहागर दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी रवींद्र फाटक यांच्याबरोबर शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील काही पदाधिकारी होते. गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाने येथील नातू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत रवींद्र फाटक यांनी नातू यांना सहकार्य करण्याची विनंती केली असून आपण एकमेकांना सहकार्य करून ही जागा निवडून आणू अशा स्वरूपाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Satara Crime News: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा लाखोंची रोकड जप्त, सातारा पोलिसांनी गुजरात पासिंगची कार धरली; पैसे कुणाचे?

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सहा वर्षांपूर्वी एक फॉर्म्युला वापरला होता. गुहागर शहर विकासआघाडी आणि त्यावेळी मिळवलेल्या १६ जागांवर यश व त्यावेळेला माजी आमदार विनय नातू यांच्या सहकार्यानेच राजेश बेंडल हे नगराध्यक्ष झाले होते. आता शहरविकास आघाडीचा तोच फॉर्म्युला माजी आमदार विनय नातू हे या विधानसभा निवडणुकीत वापरण्याची शक्यता अधिक आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आम्ही गुहागरचा उमेदवार हा विमानातून घेऊन येऊ, असं सांगत या गुहागर विधानसभा मतदारसंघात सस्पेन्स अधिकच वाढवला होता. याच मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव यापूर्वी समोर आलं होतं. मात्र, आता हे नाव मागे पडले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यावर असून ते आता पुन्हा येताना राजेश बेंडल यांना विमानातून घेऊन येतील अशी चर्चा आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.