Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्य नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वांद्रे-गोरखपूर ही अनारक्षित गाडी सकाळी ५.४५ ला सोडण्यात येणार होती, छटपूजा आणि दिवाळी असल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडल्या जातात, या गाड्यांमध्ये पोलीस प्रवाशांना आतमध्ये प्रवेश देतात. या गाडीमध्ये जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीवेळी तिथे कोणी पोलीस होते की नव्हते याबाबतही काही माहिती समोर आलेली नाही. या घटनेला चार तास उलटून गेले तरी पश्चिम रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यामधील दृश्य विदारक असून काही प्रवासी गंभीर झालेले पाहायला मिळालं. बेशुद्ध अवस्थेत जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रवाशांवर आता भाभा रूग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेचेही अधिकारी तिथे उपस्थित आहेत.
शबीर अब्दुल रेहमान – पुरुष (४०) परमेश्वर सुखधर गुप्ता – पुरुष (२८) रविंद्र हरिह चुमा – पुरुष (३०) रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजामती – पुरुष (२९) संजय तिलकराम कांगय – पुरुष (२७) दिव्यांशू योगेंद्र यादव – पुरुष (१८) मोहम्मद शरीफ शेख – पुरुष (२५) इंद्रजित सहानी – पुरुष (१९) नूर मोहम्मद शेख – पुरुष (१८) अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत.