Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, पाच टर्म आमदाराला नाकारलं, नवख्या चेहऱ्याला संधी

4

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Oct 2024, 11:05 am

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
महाराष्ट्र टॉप १० हेडलाईन्स

१. मुंबईधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 1 वरगोरखपूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये अनेकण जण जखमी झाले असून त्यांना भाभा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. शहादा पाठोपाठ नंदुरबार विधानसभेतील काँग्रेस उमेदवाराला पक्षातील नेत्यांनी विरोध केला असून शिंदे शिवसेनेने आयात केलेले किरण तडवी हे उमेदवार काँग्रेसच्या निष्ठावंतांवर लादला गेला असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी यांनी केला आहे. उमेदवार न बदलल्यास त्याच्या विरोधात उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ असेल, असे काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणूक निकालानंतर छातीठोकपणे सांगत असताना, आता मात्र बाळासाहेब थोरात यांनी आघाडीत समसमान जागांचे सूत्र जाहीर केले आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी ९० जागा लढतील आणि मित्रपक्षांना १८ जागा सोडण्यात येतील, असे त्यांनी शुक्रवारी दिल्लीत स्पष्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा मुंबईत पुनरुच्चार केला.

४. ‘विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने महायुतीकडे बारा जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, मित्रपक्षांना डावलून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च्या जागा वाढविल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोष असून ‘रिपाइं’ने महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घातला आहे. वरिष्ठ नेते रामदास आठवले यांचे आदेश येईपर्यंत बहिष्कार कायम राहील,’ अशी माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

५. पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ मतदारसंघापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच निवडणूक रंगणार आहे. म्हणजेच राष्ट्रवादीमध्येच ही लढत होणार असल्याने यावरून पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार हेही ठरणार आहे. यानिमित्ताने अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला ब्रेक लावण्याचा शरद पवार यांच्याकडून डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे.

६. देवळाली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात गेलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटालाही गळती लागली आहे.

७. भारतविरुद्धन्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हा बेंगळुरुत रंगला आणि दुसरा सामना पुण्यात रंगला. भारताने हे दोन्ही सामने न्यूझीलंडविरुद्ध गमावले. भारतीय संघ आणि त्याच्या चाहत्यांना घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्याची अजिबात सवय नाही. पण पुण्यात जे घडले ते क्वचितच पाहायला मिळते. बातमी वाचा सविस्तर…

८. बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता सुरज चव्हाण सध्या सतत चर्चेत असतो. हालाकीच्या परिस्थितीतून वर येत सुरज मी स्वतःच वेगळं असं छान विश्व तयार केलं. करोनाच्या काळात tiktok च्या माध्यमातून सुरज प्रसिद्धीच्या झोतात आलेला. त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल व्हायचे. त्यामुळे त्याला सेलिब्रिटींसारखी मागणी येऊ लागली होती.

९. दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात बुडालेल्या एका विवाहित महिलेने नवऱ्यावर स्लो पॉयजनचा प्रयोग सुरु केला. तिने नवऱ्याच्या जेवणात विष मिसळण्यास सुरुवात केली. रोज विष मिसळलेलं जेवण जेवल्यामुळे नवऱ्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केलं. आजारपणामुळे नवऱ्याचा मृत्यू होईल असं तिला वाटलेलं. पण उपचार सुरु केल्यानंतर नवऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. पत्नीला कळलं की, नवरा प्रेमात अडथळा ठरणार. त्यानंतर तिने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली. बातमी वाचा सविस्तर..

१०. प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही पैश्यांची बचत करतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवतो जिथे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळतो. लोक ही बचत त्यांच्या वृद्धापकाळासाठी करतात, तर काही जण त्यांच्या मुलांसाठी मोठा निधी उभारण्यासाठी अशा प्रकारची गुंतवणूक करतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.