Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रात्री साडेआठची वेळ, मारुती सुझुकीची कार, तपासणी पथकाची नजर पडली, अन् बोंब फुटली…

8

Chiplun Crime: मुंबई गोवा महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यासाठी मुंबई गोवा महामार्गावर खेड पोलिसांचे पथक शनिवारी रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास तैनात होते.

हायलाइट्स:

  • चिपळूण येथील एका युवकावर गुन्हा दाखल
  • पोलिसांच्या हाती लागले घबाड
  • नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
Lipi
चिपळूण गुटखा जप्त

प्रसाद रानडे,रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात प्रशासनाकडून महामार्ग विविध सागरी पोलीस ठाणे जिल्ह्यांच्या सीमा या सगळ्या भागांमध्ये करडी नजर आहे. यासाठी जिल्हाभरात भरारी पथक तैनात आहेत. वाहनांच्या संशयास्पद हालचाली या सगळ्यांवर करडी नजर आहे. जिल्हा पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्रे, हातभट्टी दारू, गुटखा विक्री, वाहतूक, किंवा कब्जा बाळगणे अशा सर्व प्रकारचे अवैध प्रकारांवर धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. याच तपासणी अंतर्गत संशयास्पद हालचाल दिसलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या इस्टीलो झेन या कारची तपासणी करण्यात आली. यावेळी मुंबई गोवा महामार्गावर खेड दाभिळ नाका येथे लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक व पाच लाख रुपयांची कार जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित फरहान फारूक मोहमद पटेल (वय ३७, रा. अली पॅलेस, गोवळकोट रोड, पालोजी बाग, पेठमाप) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपने सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराचं तिकीट कापलं, ढसाढसा रडले; मतदारसंघात नवा शिलेदार कोण?

मुंबई गोवा महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यासाठी मुंबई गोवा महामार्गावर खेड पोलिसांचे पथक शनिवारी रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास तैनात होते. यावेळी MH 02 BJ 3329 ही संस्था कार पोलिसांनी अडवली. यावेळी केलेल्या तपासणी प्रतिबंध करण्यात आलेल्या गुटखा ओके सर युक्त विमल पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत केसररयुक्त विमल पान मसालाचे एकूण सतरा पोते प्रत्येक पोत्यात प्रत्येकी बावीस पाकिटे, त्या एका पाकीटाची किंमत १९८ रूपये किंमत असलेली एकूण ७४ हजार बावन्न रुपयांची पाकीट मिळाली.

V-1 टोबॅकोचे पोते त्यात ३८ पाकीट त्या एका पाकीटाची किंमत ३० रूपये एकूण किंमत १,१४० रूपये, केसरयुक्त विमल पान मसालाचे १ पोते त्यात ३५ पाकीट त्या एका पाकीटाची किंमत १२० रूपये एकूण चार हजार दोनशे रुपये, V-1 टोबॅकोचे आणखी एक पोते त्यात 60 पाकीट त्या एका पाकीटाची किंमत ३३ रूपये एकूण किंमत एक हजार नऊशे रुपये, केसरयुक्त विमल पान मसालाचे आणखी एक पोते त्यात ६१ पाकीट त्या एका पाकीटाची किंमत १८७ रूपये एकूण किंमत ११,४०७ रूपये, एम-सेंटड टोबॅकोचे गोल्ड चे एक पोते त्यात ६ बॉक्स त्या एका बॉक्सची किंमत ६०० रूपये एकूण किंमत ३,६०० रुपये, Premium RMD PAN MASALA चे एक पोते त्यात ६ बॉक्स त्या एका बॉक्सची किंमत ९०० रूपये एकूण किमत ५,४०० रूपये, V-1 TOBACCOचे २ पोते त्यातील प्रत्येकी पोत्यात दोन पाकीट असे एकूण १८ पाकीटे, प्रत्येकी पाकिटामध्ये २२ पाकीट, त्या एका पाकीटाची किंमत २२ रूपये एकूण किंमत ८,७१२ रूपये सुमारे १ लाख ७ हजार १११ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची एक पांढर्या रंगाची मारूती सुझुकी कपंनीची झेन इस्टीलो मॉडेल असलेली चारचाकी क्रमांक MH 02 BJ 3329 ही कार जप्त करण्यात आली आहे.

या अवैध व प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक प्रकरणी भारतीय न्याय संहिता दंड विधान कलम २७४, २७५, १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, राजन सस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनानुसार खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस नितीन भोयर व त्यांच्या पोलीस पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.