Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dharashiv Makrand Raje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंद राजे निंबाळकर हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं दिसत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
मकरंद राजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मकरंद राजे निंबाळकर हे कळंब धाराशिव मतदार संघातून इच्छुक होते. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी मध्ये कळंब धाराशिव मतदार संघ हा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाला सुटला आणि विद्यमान आमदार कैलास पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. कळंब धाराशिव ऐवजी तुळजापूर मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मकरंद राजे निंबाळकर यांची इच्छा होती. परंतु तुळजापूरचाही निर्णय झाला असून तेथे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला जागा सुटली आणि धीरज पाटील यांचे नाव पुढे आल्याने मकरंद राजे निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला आहे. उद्या ते आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल करणार आहेत.
Amit Thackeray: ते पुन्हा एकत्र यावे असं वाटत नाही, अमित ठाकरेंचं राज आणि उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान
कोण आहेत मकरंद राजे निंबाळकर?
मकरंद राजे निंबाळकर हे धाराशिव नगरपालिकेचे सलग पंधरा वर्षे सदस्य होते. तसेच, सलग सात वर्षे नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवले त्यांच्या कार्य काळामध्ये त्यांनी धाराशिव शहरांमध्ये विविध विकास कामे केली असून त्यांचा जनसंपर्क हा धाराशिव शहर तसेच धाराशिव तालुका कळंब तालुका येथे दांडगा आहे. मकरंद राजे निंबाळकर यांचा कार्यकर्ता वर्ग मोठा असून कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी दाखल करण्याचा सल्ला दिला आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी घेण्यास भाग पाडले आहे. म्हणूनच की काय आज मकरंद राजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ट्विस्ट, ओमराजेंच्या घरातच बंडखोरी, बंधू मकरंद राजे निंबाळकर अपक्ष उमेदवारी लढणार?
उद्या कार्यकर्त्यांसमवेत ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत. जर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले, तर कदाचित ते मराठा समाजाचे किंवा मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार म्हणून दिसून येतील. मकरंद राजे निंबाळकर यांची नाराजी खाजा ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील हे कसे दूर करतात हे पुढील काही दिवसांमध्ये दिसून येईल