Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घ्या, शिंदेंनी समजवलं, सरवणकरांचा एकच प्रश्न अन् मुख्यमंत्री निरुत्तर
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी उमेदवारी मागे घ्या, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्याकडे केली. पण, सरवणकर यांनी एक प्रश्न विचारला आणि मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलू शकले नाहीत.
हायलाइट्स:
- माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर
- उमेदवारी मागे घ्या, शिंदेंची सरवणकरांना विनंती
- सरवणकरांच्या प्रश्नाने एकनाथ शिंदे निरुत्तरीत
Amit Thackeray: ते पुन्हा एकत्र यावे असं वाटत नाही, अमित ठाकरेंचं राज आणि उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी सरवणकरांनी मुख्यमंत्र्यासमोर असा प्रश्न उपस्थित केला की त्याचं उत्तर शिंदे देऊच शकले नाही.
या बैठकीत सदा सरवणकर यांनी शिंदेंना विचारलं की, ‘मी गेले ३० वर्ष या विभागाचं लोकप्रतिनिधित्व करत आहे. मुख्यमंत्रीसाहेब तुम्हीच सांगा, निवडणूक लढवली तर मी जिंकेन की नाही?’, सरवणकरांच्या या प्रश्नावर शिंदे काहीच उत्तर देऊ शकले नाही.
Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घ्या, शिंदेंनी समजवलं, सरवणकरांचा एकच प्रश्न अन् मुख्यमंत्री निरुत्तर
राज ठाकरे आणि भाजपमध्ये चांगले संबंध आहेत. लोकसभेतही राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना माझं समर्थन देतो असं म्हणत राज्यातील महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता त्याची परतफेड भाजपला अमित ठाकरेंविरोधात उमेदवार न देऊन करायची आहे, असं दिसतं. त्यामुळे सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिंदेंवर खूप दबाव असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.