Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिंदेंविरोधात उमेदवार टाळला, तरी राजू पाटलांविरुद्ध सेनेचा शड्डू, हीच का परतफेड? मनसे आक्रमक

10

MNS Vs Shivsena In Kalyan Gramin Constituency: लोकसभा निवडणुकीत मनसेने खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार केला. त्यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले होते. पण, आता विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी मनसेचे राजू पाटील यांच्याविरोधात उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हायलाइट्स:

  • शिवसेनेने कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार दिला
  • राजू पाटलांविरोधात शिवसेनेचा नेता रिंगणात
  • मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत
Lipi

डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून शिंदेच्या शिवसेनेने डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, लोकसभेत मुख्यमंत्री सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जिंकून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंसाठी सभाही घेतली होती. मात्र, असे असूनही कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिल्याने हीच का परतफेड? अशी चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. यामुळे मतदारसंघातील मतांचा टक्का विभागला जाण्याची भीती आहे.

राजू पाटील यांच्याविरोधात शिंदेंचा उमेदवार, मनसे आक्रमक भूमिकेत

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सुभाष भोईर अशी लढत होती. मात्र शिंदे गटानेही आता या मतदारसंघात आपला उमेदवार दिल्याने मनसेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या उमेदवारानंतर येथे आता तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेने कल्याण ग्रामीण मतदारसंघात उमेदवार दिल्याने मनसेचे पदाधिकाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारी केली आहे.
Shrinivas Vanga: गाडी, ड्रायव्हर सगळं इथेच, एकटेच पायी निघून गेले, १२ तासांपासून वनगांचा पत्ता नाही, पत्नीची चिंता वाढली
आता अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिंदेच्या सेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसून अंबरनाथमधील मनसेचे पदाधिकारी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती विश्वनिय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे किणीकर यांची डोकेदुःखी वाढणाच्या शक्यता वर्तवली जात आहे.

Raju Patil: शिंदेंविरोधात उमेदवार टाळला, तरी राजू पाटलांविरुद्ध सेनेचा शड्डू, हीच का परतफेड? मनसे आक्रमक

डोंबिवलीत मनसेने आपला उमेदवार दिलेला नाही, तर कल्याण ग्रामीण मतदारसंघाची जागा भाजपकडे न जाता सेनेकडे गेल्यामुळे भाजप पदाधिकारी यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे डोंबिवलीत मनसेची मतं निर्णायक ठरणार आहेत. तर, इकडे कल्याण ग्रामीणमध्ये भाजपची मतं निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महायुती आणि मनसेत सारं काही ओक्के नसल्याचं दिसून येत आहे. आता मनसे महायुतीला पाठिंबा देणार की त्यांच्याविरोधात लढणार नाही हे पाहावं लागणार आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.